Jammu-Kashmir Election Result : राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा सुपडा साफ; किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त?

NCP Shiv Sena Election 2024 Result : अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने जम्मू-काश्मीरमध्ये उमेदवार उतरवले होते.
Ajit Pawar, Uddhav Thackeray
Ajit Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या दोन पक्षांना जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बहुतेक सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, अशी स्थिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. काही मोजक्यात मतदारसंघात अजितदादांनी उमेदवार उतरवले होते. पण एकाही मतदारसंघात पक्षाला आपले अस्तित्वही दाखवता आले नाही. काही मतदारसंघात तर पक्षाचे उमेदवार तळाशी राहिले आहे. अपक्ष आणि नोटापेक्षाही कमी मते राष्ट्रवादीच्या उमेदावारांना मिळाली आहेत.

Ajit Pawar, Uddhav Thackeray
Chief Minister News : हरियाणा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ठरले; नेत्यांकडून मोठी घोषणा

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही अशीच गत झाली आहे. काही मतदारसंघात शिवसेनेने उतरवले उमेदवार पराभूत झाले. सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विजयी उमेदवार आणि या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या मतांमध्ये मोठे अंतर असल्याचे दिसते.

राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही उमेदवारांना मिळालेली मतदारसंघनिहाय मते -  

1. हजरतबल - सलमान सागर (नॅशनल कॉन्फरन्स) - 18890, शादीब खान – 96

2. पुलवामा - वहीद पारा (पीडीपी) - 25627, इश्तियाक शेख (राष्ट्रवादी) - 400

3. राजपुरा - गुलाम मीर (नॅशनल कॉन्फरन्स) - 8510, अरुण कुमार रैना (राष्ट्रवादी) - 177
4. बिरवाह - शफी वाणी (नॅशनल कॉन्फरन्स) - 20118, नाजीर खान (राष्ट्रवादी) - 431
5. खानसाहिब - सैफ उददीन भट (नॅशनल कॉन्फरन्स) - 33225, शहनाज शाह (राष्ट्रवादी) - 206

Ajit Pawar, Uddhav Thackeray
Vinesh Phogat Won : बहिणीला जे जमलं नाही ते विनेशनं करून दाखवलं! विधानसभेत थाटात एन्ट्री

6. बाहू – विक्रम रंधवा (भाजप) – 40385, बिशन दास बबोरिया (राष्ट्रवादी) – 136

7. ईदगाह – मुबारिक गुल (नॅशलन कॉन्फरन्स) – 7700, निसार अहमद दर (राष्ट्रवादी) - 65

8. भदरवाह – दिलीप सिंह (भाजप) – 42128, विनोद कुमार (शिवसेना UBT) – 165

9. बिशनाह – राजीव कुमार (भाजप) – 53435, जय भारत (शिवसेना UBT) – 475

10. डोडा पश्चिम – शक्ती राज परिहार (भाजप) – 33964, तिलक राज शान (शिवसेना UBT) - 162

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com