Congress Politics : वडिलांचा पराभव झालेल्या दोन मतदारसंघात काँग्रेसकडून मुलांचे लाँचिंग

Randeep Surjewala Haryana Assembly Election : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि जयप्रकाश सहारण हे दोघे मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
Vikas Saharan, Aditya Surjewala
Vikas Saharan, Aditya SurjewalaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुतेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक मतदारसंघात विद्यमान आमदारांसह नेत्यांच्या नेत्यांच्या नातेवाईकांना मैदानात उतरवण्यात आले आहे. यापैकी दोन मतदारसंघातील लढत रंगतदार ठरणार आहे.

काँग्रेसने कैथल मतदारसंघातून आदित्य सुरजेवाला आणि कलायतमधून विकास सहारण यांना उमेदवारी दिली आहे. आदित्य हे काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला आणि विकास हे हिसार मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार जयप्रकाश यांचे पुत्र आहेत. या निवडणुकीत दोघांनीही आपल्या मुलांना लाँच केले आहे.

Vikas Saharan, Aditya Surjewala
Devendra Fadnavis : मनमोहन सिंग यांचे ‘ते’ दोन फोटो दाखवत फडणवीस संतापले; म्हणाले, प्रश्न गहन आहे...

सुरजेवाला आणि जयप्रकाश या दोघांनाही मागील निवडणुकीत काँग्रेसने उतरवले होते. पण दोघांचाही पराभव झाला. आता पक्षाने त्यांच्या मुलांना रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून रणदीप सुरजेवाला हे स्वत: निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा होती. पण मुलाला तिकीट देत पक्षाने त्यांना सूचक संदेश दिल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे जयप्रकाश यांनी आपल्या मुलासाठी अनेक दिवसांपासून फिल्डींग लावली होती. मुलाला तिकीट मिळणार, या आत्मविश्वासात त्यांनी उमेदवारीची घोषणा होण्याआधीच बुधवारी उमेदवारी अर्जही भरला. तर सुरजेवाला यांनीही बुधवारी मुलासाठी सभा घेतली.

Vikas Saharan, Aditya Surjewala
Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांचे निधन; 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आदित्य सुरजेवाला यांच्यासाठी ही लढत सोपी असणार नाही. त्यांच्याविरोधात भाजपकडून लीलाराम गुर्जर, बसपाचे अनिल तंवर आणि आपचे सतवीर गोयल रिंगणात आहेत. 2019 च्या निवडणुकीत लीलाराम यांनी आदित्य यांच्या वडिलांचा पराभव केला होता. सुरजेवाला यांचा केवळ 1246 मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यामुळे यावेळीही काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत होईल, असे मानले जाते. वडिलांच्या पराभवाचा वचपा आदित्य काढणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com