MVA News : धारावीत 'सांगली'ची पुनरावृत्ती; काँग्रेसच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा

Political News : महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता जागावाटपात काही मतदारसंघात अदलाबदली केली जाणार का ? याची उत्सुकता लागली आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता जागावाटपात काही मतदारसंघात अदलाबदली केली जाणार का ? याची उत्सुकता लागली आहे. त्यातच आता मुंबईतील धारावी मतदारसंघावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या या हक्काच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. या ठिकाणाहून माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) चारवेळा निवडून आल्या आहेत. तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामुळे धारावी मतदारसंघावर कॉँग्रेससोबतच शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. (MVA News)

दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात धारावी विधानसभा मतदारसंघ येतो. हा मतदारसंघ काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड या मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यापाठोपाठ त्यांची कन्या वर्षा गायकवाड या सलग चार वेळा येथून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र वर्षा गायकवाड उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत. तर, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई हे दक्षिण-मध्य लोकसभेचे खासदार आहेत.

लोकसभा निवडणुकीत अनिल देसाई यांनी माजी खासदार व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा या मतदारसंघात पराभव केला. देसाई यांच्या विजयात धारावी विधानसभेचा मोठा वाटा आहे. अनिल देसाई यांना धारावीत 76 हजार 677 मते मिळाली होती. तर, राहुल शेवाळेंना केवळ 39 हजार 820 मतं मिळाली होती. ही आकडेवारी पाहता होऊ घातलेली विधानसभा निवडणूक मविआसाठी या मतदारसंघात सोपी ठरू शकते.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Nitin Gadkari : विमानतळाच्या कामासाठी मीच ‘सुपरवायझर'..., नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना भरला दम

वर्षा गायकवाड लोकसभेवर गेल्या असल्या तरी त्यांची व काँग्रेसची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल. मात्र, काँग्रेसकडून येथून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न अनेकंना पडला आहे. तर महायुतीत या जागेसाठी भाजप व शिवसेनेचा शिंदे गट आग्रही आहे. त्यामुळे आता ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याची उत्सुकता लागली आहे.

शिवसेना-भाजपच्या आजवरच्या युतीत ही जागा सातत्याने शिवसेना लढवत आहे. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बाबुराव मोरे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. या मतदारसंघावर शिवसेनेचीही चांगली पकड आहे. तसेच धारावीमधील पुनर्विकास प्रकल्पावरून या मतदारसंघात भाजपाविरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शिंदे गट किंवा भाजप, कोणत्याही पक्षाने येथून निवडणूक लढवली तरी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Mahayuti News : सुपडासाफ, पाडापाडीच्या भाषेला महायुतीत आता ब्रेक लागणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com