हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं पावले टाकत आहे. हरियाणाच्या मैदानात काँग्रेस पूर्ण ताकदीनं उतरली होती. सुरूवातीला बहुमताचा आकडा पार केलेली काँग्रेस अचानक पिछाडीवर गेली. हरियाणात भाजप 49 आणि 35 जागांवर आघाडीवर आहे. सर्व 'एक्झिट पोल'मध्ये काँग्रेसला सत्ता मिळताना दिसत होती. मात्र, निकाल समोर आल्यानंतर काँग्रेसला '440 वोल्ट'चा झटका बसला आहे.
या निवडणुकीत अनेक स्टार प्रचारकांनी मैदान गाजवलं. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने हरियाणाच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा प्रचार केला होता. तो उमेदवार म्हणजे काँग्रसचे ( Congress ) अनिरुद्ध चौधरी. चौधरी हे तोशाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत होते. त्यांच्याविरुद्ध भाजपच्या ( Bjp ) श्रृती चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मात्र, सेहवागने प्रचार केलेल्या अनिरुद्ध चौधरी यांना किती मते पडली? सेहवागच्या प्रचाराचा काही प्रभाव पडला का? असे सवाल उपस्थित होत होते. मात्र, तोशाम विधानसभा मतदारसंघातून श्रृती चौधरी 10 हजार 496 मतांनी आघाडीवर आहेत.
मतमोजणीच्या एकूण 17 फेऱ्या आहेत. मात्र, 12व्या फेरीनंतर श्रृती चौधरी यांना 56 हजार 787 मते मिळाली आहेत. तर, अनिरुद्ध चौधरी यांना 46 हजार 291 मते पडली आहेत. अनिरुद्ध चौधरी हे पिछाडीवर असल्याचं दिसत आहेत.
सेहवागने प्रचारावेळी काय म्हटलं होतं?
"मी त्यांना ( अनिरुद्ध चौधरी ) यांना मोठा भाऊ मानतो. अनिरुद्ध चौधरी यांचे वडील ( रणबीर सिंह महेंद्र ) 'बीसीसीआय'चे अध्यक्ष असताना मला पाठिंबा देण्याचं काम केलं होतं. त्यामुळे अनिरुद्ध चौधरी यांना मी मदत करू शकेल, असं मला वाटतं. तोशाम मतदारसंघातील जनतेनं अनिरुद्ध चौधरी यांना निवडून द्यावे," असं आवाहन सेहवागने केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.