Haryana Election Result : हरियाणातील निवडणुकीत चालले नाहीत तीन 'लाल'; मुलगा, नातू, पणतू, जावई सगळेच होते रिंगणात...

Chaudhury Devi Lal Bansi Lal Bhajan Lal : हरियाणातील निकालानंतर राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Haryana Election
Haryana ElectionSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेससह राज्यातील तीन कुटुंबांनाही धुळ चारली आहे. भाजपने 48 जागा जिंकत स्वबळावर सत्ता मिळवली. तर काँग्रेसला केवळ 37 जागांवर समाधान मानावे लागले. आम आदमी पक्ष आणि जननायक जनता पक्षाला खातेही खोलता आले नाही.

हरियाणाच्या निवडणुकीत अनेक कुटुंबातील नेतेही आमनेसामने उभे ठाकले होती. प्रामुख्याने तीन बड्या घराण्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उमेदवारीने उत्सुकता वाढली होती. पण या तिन्ही कुटुंबाच्या पदरी अपयश आले आहे.

Haryana Election
Election Commission : निवडणुकीनंतर आयोगाचे खर्गेंना पत्र; थेट कार्यालयातच भेटायला बोलावले... 

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि हरियाणाची माजी मुख्यमंत्री चौधरी देवीलाल याचे त्यापैकी एक कुटुंब. देवीलाल यांच्या कुटुंबातील दहा सदस्यांनी निवडणूक लढवली. प केवळ दोघांनाच विजय मिळवता आला. देवीलाल यांचे नातू अर्जून चौटाला आणि आदित्य चौटाला या दोघांचाच विजय झाला आहे. त्यांनी अनुकमे रनिया आण डबवाली मतदारसंघातून विजय मिळवत घराण्याची लाज राखली.

देवीलाल यांचे पणतू व माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचाही पराभव झाला आहे. ते थेट पाचव्या स्थानावर फेकले गेले. हा देवीलाल कुटुंबासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. सर्वाधिक सदस्य याच कुटुंबातील निवडणुकीत उतरले होते.

Haryana Election
Election Commission : निवडणुकीनंतर आयोगाचे खर्गेंना पत्र; थेट कार्यालयातच भेटायला बोलावले... 

राज्यातील दुसरे मोठे घराणे म्हणजे माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांचे. त्यांच्या कुटुंबातील तिघांनी निवडणूक लढवली. पण केवळ एकालाच विजय मिळवता आला. बंसीलाल यांच्या नात श्रृती चौधरी यांचा तोशाम मतदारसंघातून दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने चुलत बंधू अनिरुध्द चौधरी यांना तिकीट दिले होते. त्यामुळे ही लढत बहीण विरुध्द भाऊ अशी झाली होती. सोमवीर सांगवान हे या कुटुंबातील तिसरे सदस्य निवडणुकीच्या रिंगणात होते. ते बन्सीलाल यांचे जावई आहेत. बाढडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढली. मात्र त्यांचा पराभव झाला.

हरियाणामध्ये माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचाही कधीकाळी दबदबा होता. या निवडणुकीत कुटुंबातील तिघांनी नशीब आजमावले पण केवळ एकाचाच विजय झाला. भजनलाल यांचे पुत्र चंद्रमोहन बिश्नोई यांनी पंचकूला मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला.

भजनलाल यांचे भाचे दुडाराम बिश्नोई आणि नातू भव्य बिश्नोई या दोघांनाही पराभव पत्करावा लागला. हे दोघेही अनुक्रमे फतेहाबाद आणि आदमपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार होते. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com