Haryana Political News : आघाडीतून बाहेर पडलेल्या पक्षालाच भाजपने फोडले? दहापैकी पाच आमदार गायब...

BJP-JPP Alliance : लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावर भाजप आणि जेपीपीमध्ये वाद निर्माण झाले होते. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे मानले जात आहे.
Haryana Political News : आघाडीतून बाहेर पडलेल्या पक्षालाच भाजपने फोडले? दहापैकी पाच आमदार गायब...
Published on
Updated on

Chandigarh News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच मनोहरलाल खट्टर यांचे कौतुक केले होते. त्यानंतर काही तासांतच खट्टर यांनी आज हरियाणाच्या (Haryana Political News) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याला आजच नवे मुख्यमंत्रिही मिळणार आहेत. भाजप आणि जननायक जनता पक्षाची आघाडी तुटल्याने ही राजकीय उलथापालथ सुरू आहे. त्यातच भाजपने मोठी खेळी खेळत जेजेपीला मोठा धक्का दिला आहे.

भाजपचे (BJP) राज्यात 41 आमदार आहेत. तर जेजेपीचे दहा आमदार. दोन्ही पक्षांचे मिळून 51 आमदार होते. बहुमतासाठी 46 आमदारांची (MLA) गरज असते. पण आघाडी तुटल्याने भाजपने अपक्षांना सोबत घेत पुन्हा सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आज सायंकाळी नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Haryana Political News : आघाडीतून बाहेर पडलेल्या पक्षालाच भाजपने फोडले? दहापैकी पाच आमदार गायब...
Nayab Singh Saini News : हरियाणाला मिळणार नवे मुख्यमंत्री; आधी आमदार, खासदार अन् आता CM...

एकीकडे नवे मुख्यमंत्री शपथ घेणार असताना भाजपने जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला (Dushyant chautala) यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या पक्षाचे पाच आमदार भाजपने फोडल्याची जोरदार चर्चा आहे. आमदारांच्या बैठकीत हे पाच आमदार आज उपस्थित होते. पक्षाचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील नेत्यांनी मात्र पक्ष एकजूट असल्याचा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जेजेपीचे (JJP) प्रवक्ते अरविंद भारद्वाज यांनी सांगितले की, ‘जेजेपीचा एकही आमदार फुटणार नाही. सर्व एकजूट आहेत. आमचा पक्ष आता राज्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) सर्व दहा जागा तर विधानसभेच्या 90 जागा लढवणार आहे.’ दरम्यान, दोन्ही पक्षांमध्य जवळपास चार वर्षे सरकारल चालले. दुष्यंत चौटाला या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. पण लोकसभेच्या जागावाटपावरून आघाडीत बिघाडी झाली.

काँग्रेसकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी

काँग्रेसचे (Congress) नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. सरकारकडे बहुमत नसल्यानेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. आता राष्ट्रपती राजवटीखालीच राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्याची मागणी हुडा यांनी केली आहे.

Haryana Political News : आघाडीतून बाहेर पडलेल्या पक्षालाच भाजपने फोडले? दहापैकी पाच आमदार गायब...
Social Media trolling : ट्रोलिंगमुळं महिलेनं केली आत्महत्या; जगनमोहन यांचं केलं होतं कौतुक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com