Social Media trolling : ट्रोलिंगमुळं महिलेनं केली आत्महत्या; जगनमोहन यांचं केलं होतं कौतुक...

Geetanjali Devi News : गीतांजली देवी यांना तेलगू देसम आणि जन सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ट्रोल केल्याचा आरोप जगनमोहन यांच्या पक्षाने केला आहे.
Jagan Mohan Reddy, Geetanjali Devi
Jagan Mohan Reddy, Geetanjali DeviSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : घरासाठी हक्काची जागा मिळाल्यानंतर गीतांजली देवी आनंदित होत्या. हा आनंद व्यक्त करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारचं तोंडभरून कौतुक केलं. पण हेच कौतुक त्यांच्या जिवावर बेतलं आहे. सोशल मीडियात (Social Media trolling) त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेकांनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया देत गीतांजली यांना ट्रोल केले. त्यानंतर त्यांनी आठवडाभरापूर्वी धावत्या रेल्वेखाली उडी मारली. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

32 वर्षीय गीतांजली देवी आपल्या दोन शाळकरी मुलींसह राहत होत्या. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झाले होते. वायएसआर काँग्रेस पक्षाच्या (YSR Congress Party) 4 मार्च रोजीच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला होता.

Jagan Mohan Reddy, Geetanjali Devi
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या दुसऱ्या यादीत तरी गडकरींचा नंबर लागणार का? आज होणार फैसला...

व्हिडिओमध्ये गीतांजली यांनी म्हटले होते की, ‘जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) सरकारच्या अनेक योजनांचे आपण लाभार्थी आहोत. माझे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. घर माझ्या नावावर झाले आहे. मी खूप आनंदित आहे. जगनमोहन रेड्डी विजयी होण्यासाठी मी मतदान करणार आहे. त्यांनी माझे स्वप्न पूर्ण केले. त्यासाठी मी एक पैसाही दिला नाही.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गीतांजली यांचा हा व्हिडिओ जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाकडून ‘स्टार कॅम्पेनर ऑफ द डे’ असे म्हणत व्हायरल केला होता. पण अनेकांनी या व्हिडिओवरून गीतांजली यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरून तो त्यांना ट्रोल केले. त्यामध्ये तेलगू देसम आणि जन सेवा पक्षाच्या लोकांचा हात आहे. गीतांजली यांनी पैसे घेतल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा जगनमोहन यांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे.

ट्रोलिंगचा त्रास सहन न झाल्यामुळे गीतांजली यांनी सात मार्चला धावत्या रेल्वेखाली उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गीतांजली यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

R

Jagan Mohan Reddy, Geetanjali Devi
Manohar Lal Khattar resigns : हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप; मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com