Congress News : काँग्रेसला मोठा धक्का; कार्यकारी अध्यक्षांच्या आमदार पत्नीनेच केली गद्दारी, 11 जणांचे पद धोक्यात...

Haryana Rajya Sabha election controversy : ओडिशामध्येही काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजप समर्थित उमेदवाराला मतदान केल्याचे समोर आले आहे. या तीन आमदारांना पक्षाने निलंबित केले आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress cross voting : राज्यसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा धक्का काँग्रेस पक्षाला बसला आहे. प्रामुख्याने हरियाणा, बिहार आणि ओडिशामध्ये पक्षाच्या आमदारांनी गद्दारी करत सत्ताधारी एनडीएच्या उमेदवारांना मतदान केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या आमदारांपैकी एक आमदार काँग्रेसच्या प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षांचीच पत्नी असल्याची चर्चा आहे.

हरियाणामध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मतदान केले आहे. या पाचमध्ये आमदार शैली चौधरी यांचे नाव आहे. त्या हरियाणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रामकिशन चौधरी यांच्या पत्नी आहेत.

सोशल मीडियामध्ये चौधरी यांच्यासह पाच जणांची नावे व्हायरल होत आहेत. त्यानंतर रामकिशन चौधरी यांनी तडकाफडकी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी पाच आमदारांची नावे पक्षाध्यक्षांकडे पाठविल्याची माहिती दिली आहे.

Congress News
Rajya Sabha Election update : हरियाणात मध्यरात्री एका मताने राखली काँग्रेसची लाज; भाजपने गेम पलटवला होता, पण अखेर पराभव...

नैतिकतेच्या आधारे या पाच आमदारांनी स्वत:हून पदाचा राजीनामा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पाच आमदारांची नावे उघड करण्यास मात्र नकार दिला. हे पाच आमदार कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे, असे ते म्हणाले. या पाच आमदारांमुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा विजय धोक्यात आला होता.

तीन आमदार निलंबित

ओडिशामध्येही काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजप समर्थित उमेदवाराला मतदान केल्याचे समोर आले आहे. या तीन आमदारांना पक्षाने निलंबित केले आहे. रमेश चंद्र जेना, दसरशी गोमांगो आणि सोफिया फिरदौस अशी त्यांची नावे आहेत. काँग्रेसला धोका देणाऱ्यांनी देशाचा विश्वासघात केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आमदार म्हणून त्यांना अपात्र ठरविण्यासाठी पक्ष पावले उचलणार आहे. 

Congress News
Lok Sabha update : मोठी बातमी : लोकसभेत ‘सीजफायर’, PM मोदींना घेरणारे विरोधक नरमले; पडोळेंसह 8 खासदारांचा वनवास संपला...

बिहारमध्ये क्रॉस वोटिंग झाले नसले तरी काँग्रेसच्या तीन आमदारांनी मतदानातच सहभाग घेतला नाही. त्यामुळे आरजेडीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या तीन आमदारांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या ११ आमदारांनी गद्दारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com