Hathras Stampede : 121 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला भोलेबाबा होता गुप्तहेर

Bhole Baba Satsang Narayan Saakar Hari : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मंगळवारी भोले बाबाच्या सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला आहे.
Bhole Baba
Bhole BabaSarkarnama

Hathras : स्वयंघोषित भोलेबाबा उर्फ नारायण साकार हरी हा हाथरस येथील सत्संगातील चेंगराचेंगरीनंतर फरार झाला आहे. या दुर्घटनेत तब्बल 121 जणांचा बळी गेला आहे. हा बाबा सत्संगांमध्ये आपण गुप्तचर यंत्रणेत काम केले असल्याचा दावा नेहमी करायचा. त्यावेळीच आपला ओढा अध्यात्माकडे असल्याचा दावाही तो करायचा.  

भोलेबाबाने आयोजित केलेल्या एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन मंगळवारी 121 जणांचा मृत्यू झाला आहे. अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्यासाठी 1999 मध्ये गुप्तचर यंत्रणेतून राजीनामा दिल्याचा दावा बाबाकडून केला जातो.

कोण आहे भोलेबाबा?

भोलेबाबा हा मुळचा उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्यातील आहे. त्याचे आई-वडील शेतकरी असून त्याला दोन भाऊही होते. त्याचे खरे नाव सुरज पाल हे आहे. बाबाने गावातच शालेय शिक्षण पूर्ण केले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या गुप्तचर विभागात तो हेड कॉन्स्टेबल होता.

Bhole Baba
Bhole Baba and Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर भोलेबाबा फरार, फोनही बंद; पोलिसांकडून शोध सुरू!

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुप्तचर विभागामध्ये काम सुरू केले आणि त्यादरम्यानच अध्यात्माकडे वळल्याचा दावा पाल नेहमी करतो. त्याने 1999 मध्ये नोकरी सोडली आणि आपले नाव नारायण साकार हरी असे बदलले. स्वयंघोषित गुरू झाल्यानंतर या बाबाने कधीच भगवी वस्त्र परिधान केली नाहीत. तो पांढरा सुट आणि टायमध्ये असतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

बाबाची पत्नी त्याला सत्संगाच्या कामात मदत करते. आपल्याला मिळालेले डोनेशन स्वत:कडे न ठेवता त्याचा उपयोग भक्तांसाठीच करत असल्याचा दावा बाबाकडून केला जातो. आपण हरीचे शिष्य असल्याचा दावा बाबा करतो. अध्यात्माकडे वळल्यानंतर त्याने चांगलाच जम बसवला आणि या भागात आपली प्रस्थ निर्माण केले आहे.

Bhole Baba
Rashid Engineer And Amritpal Singh : राशिद यांना शपथेचा मार्ग मोकळा; अमृतपाल यांचं काय होणार ? खासदारकी रद्द होणार?

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये त्याला मानणारा वर्ग मोठा आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीनंतर 121 जणांचा मृत्यू झाला आणि बाबा फरार झाला आहे. पोलिसांकडून सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला असला तरी त्यामध्ये भोलेबाबाचे नाव नाही. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com