Video Rahul Gandhi : मोदी-शहांच्या गुजरातमध्ये जाऊन राहुल गांधींनी ठोकला शड्डू, म्हणाले, विधानसभेला...

Rahul Gandhi On Narendra Modi : मोदी कोणालाच आवडत नाहीत. एका माणसासमोर पक्षाचा कार्यकर्ता हवालदिल झाला आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.
rahul gandhi
rahul gandhisarkarnama
Published on
Updated on

अयोध्येमध्येच भाजपचा धुव्वा उडवून 'इंडिया' आघाडीनं कधीकाळी लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला आहे. पुढील गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजपला आस्मान दाखवू, असा कॉन्फिडन्स काँग्रेस नेते, राहुल गांधींनी व्यक्त केला आहे.

शनिवारी गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

"लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं अयोध्येत भाजपचा ( Bjp ) पराभव करण्यात आला होता. तशाच प्रकारचा पराभव गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत करण्यात येईल. त्यांनी अहमदाबादेतील आमचे कार्यालय फोडले. आता आम्ही त्यांचे सरकार फोडू," असा इशारा देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना ( Narendra Modi ) लक्ष्य केलं.

"निवडणुकीपूर्वी तुम्हाला अयोध्येत भाजपचा पराभव होईल असं वाटले होते का? अयोध्येत जसा भाजपला पराभव पत्करावा लागला तसाच आता गुजरातमध्येही होईल. गुजरातची जनता न घाबरता लढली, तर भाजपचा निश्चित पराभव होईल," असं राहुल गांधींनी म्हटलं.

"पराभवाच्या भीतीनं वाराणसीला पळाले"

"अयोध्येतील लोकांमध्ये भाजपबद्दल प्रचंड राग आहे. लोकांची घरे, दुकानं पाडली. आजपर्यंत नुकसनाभरपाई मिळाली नाही. अयोध्येतून विजयी झालेल्या खासदारानं मला सांगितलं की मोदींना वाराणसीतून नाही, तर अयोध्येतून लढायचे होते. पण, तिथल्या सर्वेक्षणकर्त्यांनी म्हटलं की, अयोध्येतून लढला तर तुमचा पराभव होईल. त्यामुळे ते वाराणसीला पळाले. वाराणसीत आमची छोटीशी चूक झाली. अन्यथा आम्ही तिथे जिंकलो असतो," असं राहुल गांधींनी सांगितलं.

"मोदी कुणालाच आवडत नाहीत"

"मोदी कोणालाच आवडत नाहीत. एका माणसासमोर पक्षाचा कार्यकर्ता हवालदिल झाला आहे. 'आरएसएस'ची हवा निघून गेली आहे. पण, काँग्रेसमध्ये असं होत नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यासमोर कार्यकर्ता उभा राहू शकतो," असं राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com