Video Bhole Baba : 121 जणांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच भोले बाबा आले समोर; म्हणाले, मी...

Hathras stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकरसह सहा जणांना अटक केली आहे.
bhole baba
bhole babasarkarnama

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबा उर्फ सुरजपाल यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत 121 जणांना दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातच भोले बाबा यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

2 जुलैच्या घटनेनंतर मी प्रचंड दु:खी आहे. जनतेनं प्रशासनावर विश्वास ठेवायला हवा, असं भोले बाबा यांनी म्हटलं आहे. ते 'एएनआय'शी संवाद साधत होते.

भोले बाबा म्हणाले, "2 जुलैच्या घटनेनंतर मी खूप दु:खी झालो आहे. देवानं आम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. जनतेनं प्रशासनावर विश्वास ठेवायला हवा. अराजकता माजवणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नाही. शोकग्रस्त कुटुंबाच्या पाठिशी उभे राहून त्यांना मदत करण्यासाठी वकील एपी. सिंह यांना सांगितलं आहे."

नेमकं काय घडलं होतं?

भोले बाबा यांच्या सत्संगासाठी 80 हजार जणांची परवानगी असतानाही त्या दिवशी 2.50 लाख भाविक जमले होते. सत्संग संपल्यावर भोले बाबा यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी भाविकांनी धाव घेतली. त्यामुळे अनेकजण खाली पडले. त्यांच्यावर अंगावरून भाविक जात राहिले.

bhole baba
Hathras Stampede : 121 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला भोलेबाबा होता गुप्तहेर

काही क्षणांत या पळापळीचं चेंगराचेंगरीत रूपांतर झालं. पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखत होते. त्यामुळे मागे गर्दी वाढली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला. त्यात 100 हून अधिक महिलांचा समावेश आहे. अनेकजण जखमीही झाले होते.

याप्रकरणी सत्संगाचा मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकरसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ( Police ) मधुकरसह सहा जणांना अटक केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com