Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात पोहाेचला आहे. आता शुक्रवारी पक्षासंदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. शरद पवारांकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे निवडणूक आयोगात बाजू मांडणार आहेत. या अनुषंगानेच शरद पवारांनी दिल्लीत विस्तारीत कार्यसमितीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत उद्या निवडणूक आयोगात होणाऱ्या पक्षाच्या सुनावणीसंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच जर निवडणूक आयोगाकडून पक्ष चिन्ह गोठवलं गेलं, तर पुढची रणनीती काय असेल ? या संदर्भानेदेखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या कार्यकारिणी बैठकीत शरद पवार पदाधिकाऱ्यांना सर्वच राजकीय घडामोडीसंदर्भात मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
याबरोबरच ईशान्य राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, रोहिणी खडसे यांच्यासह आदी नेते उपस्थित आहेत.
दरम्यान, शरद पवार गटाकडून तब्बल 8 ते 9 हजार शपथपत्र आयोगात सादर करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच अजित पवार गटापेक्षा शपथपत्रांची संख्या जास्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाचा निर्णय काय येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.