Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादीचा फैसला ? अभिषेक मनू सिंघवी मांडणार शरद पवारांची बाजू

Abhishek Singhvi : शरद पवार की अजित पवार, खरी राष्ट्रवादी कोणाची ? उद्या होणार सुनावणी
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात गेला आहे. राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटांत पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगात ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार आहेत, तर अजित पवार गटाच्या वतीने कोण बाजू मांडणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अजित पवार गटाने सादर केलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये सरकारी कर्मचारी आणि मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्रांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Sharad Pawar and Ajit Pawar
Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांचा धनगर समाजाला आरक्षणाचा शब्द; म्हणाले...

तसेच अजित पवारांच्या अॅफिडेव्हिटमध्ये 60 सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असून, यामध्ये 98 जणाचे अॅफिडेव्हिट शिक्षण संस्थेचे कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे, तर शरद पवार गटाचे अॅफिडेव्हिट अजित पवार गटापेक्षा चार हजार जास्त असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसल्याचे अनेकदा सांगण्यात आले. तसेच अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष नेमका कुणाचा ? निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ? निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला बोलावलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Senior leaders of Nationalist Congress Sharad pawar Party attend a key meeting in Pune under the leadership of Sharad Pawar.
Sharad Pawar On Narendra Modi .jpg
Sharad Pawar and Sunil Tatkare
Sunetra Pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com