Hemant Soren News : हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार; चंपाई सोरेन यांनी दिला राजीनामा!

Champai Soren Resigned : चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी सायंकाळी उशीरा राजभवनात पोहचून चंपई सोरेन यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला.
Hemant Soren
Hemant SorenSarkarnama
Published on
Updated on

Jharkhand Chief Minister News : झारखंडमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी सायंकाळी उशीरा राजभवनात पोहचून चंपई सोरेन यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला.

यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा सादर करण्यात आला. याचाच अर्थ आता हेमंत सोरेन हे पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत.

झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) नेतृत्वातील आघाडीच्या आमदारांच्या सर्वसमंतीनंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून नवी इनिंग सुरू करण्यात तयार आहेत.

आघाडीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी रांचीमध्ये मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या निवासस्थानी एका बैठकीत सर्वसंमतीने हेमंत सोरेन यांना जेएमएम विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले. पक्षातील एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, बैठकीत चंपई सोरेन यांच्या जागी हेमंत सोरेन यांना आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

Hemant Soren
Hemant Soren : चंपई सोरेन देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा? राजकीय घडामोडींना वेग…

झारखंडमध्ये सरकार बनवण्याचा दावा सादर केल्यानंतर जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन(Hemant Soren) यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी तुम्हाला सर्व काही सांगितले आहे. आम्हीही तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगू. आम्ही सर्व प्रक्रियांचे पालन केले आहे.'

राज्यपालांना राजीनामा सोपवल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन(Champai Soren) यांनी म्हटले की, 'काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री बनवलं गेलं आणि मला राज्याची जबाबदारी मिळाली. हेमंत सोरेन परत आल्यानंतर आमच्या आघाडीने हा निर्णय घेतला आणि आम्ही हेमंत सोरेन यांना आमचा नेता म्हणून निवडले. आता मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.'

Hemant Soren
Sharad Pawar : हेमंत सोरेन यांची तब्बल 149 दिवसांनी सुटका, शरद पवारांचे सूचक ट्विट; म्हणाले, 'सत्यमेव जयते'

हेमंत सोरेन यांना जवळपास पाच महिन्यांनंतर 28 जून रोजी तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. उच्च न्यायालयाने कथित भूमी घोटाळ्याशी निगडीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना जामीन दिला होता. 31 जानेवारी रोजी अटकेपूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यावर 31 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची 8.86 एकर जमीन अवैधरित्या मिळवल्याचा आरोप आहे. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची राजीनामा दिल्यानंत तत्काळ 31 जानेवारी रोजी कथित भूमी घोटाळ्याशी संबधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com