Sharad Pawar : हेमंत सोरेन यांची तब्बल 149 दिवसांनी सुटका, शरद पवारांचे सूचक ट्विट; म्हणाले, 'सत्यमेव जयते'

Sharad Pawar Reaction hemant Soren Bail : शरद पवार म्हणाले, एनडीए सरकारकडे आमची मागणी राहील, की सूड भावनेने कोणतीही कारवाई न होता संविधानानुसार लोकशाहीची भरभराट होईल अशी कामगिरी करावी.
Sharad Pawar hemant Soren Bail
Sharad Pawar hemant Soren Bail sarkarnama

Sharad Pawar News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला आहे. कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली होती. मात्र, झारखंड विधानसभेच्या आधी सोरेन यांना जामीन मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोरेन यांच्या जामीनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित खटल्यात तुरुंगवास भोगावा लागला. 149 दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला. सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे.

एनडीए NDA सरकारकडे आमची मागणी राहील, की सूड भावनेने कोणतीही कारवाई न होता संविधानानुसार लोकशाहीची भरभराट होईल अशी कामगिरी करावी. सत्यमेव जयते!असे देखील शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

एजन्सीचा गैरवापर हा विरोधकांच्या बाबतीत केला गेला. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुगांत टाकले गेले. सुदैवाने त्यातील एकाची सुटका केली. खालच्या कोर्टाचा निकाल आला तर वरच्या कोर्टात जावून निकाल बदलायचा. एजन्सीचा गैरवापर केला जातो. हे जे केलं जातयं त्याच्या विरोधात पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करणार आहोत, असे शरद पवार Sharad Pawar कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

Sharad Pawar hemant Soren Bail
Video Satej Patil Vs Dada Bhuse : दादा भुसेंनी एक वक्तव्य केलं अन् सतेज पाटील तुटून पडले; नेमकं काय घडलं?

लोक विश्वास ठेवणार नाहीत

अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा फायदा विधानसभेत महायुतीला होईल का? या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले, विधानसभेचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर या गोष्टी कृतीत येणार नाहीत. त्यासाठी पुरेसी तरतूद नाही.असा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. अर्थसंकल्प हा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर मांडला आहे. ज्या तरतूदी केल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागतील. लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com