Champai Soren, Hemant Soren
Champai Soren, Hemant SorenSarkarnama

Hemant Soren : चंपई सोरेन देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा? राजकीय घडामोडींना वेग…

Jharkhand Chief Minister Champai Soren Hemant Soren Bail : हेमंत सोरेन यांनी कथित भूखंड घोटाळाप्रकरणी नुकताच जामीन मिळाल्यानंतर ते जेलमधून बाहेर आले आहेत.

New Delhi : झारखंडमध्ये सहा महिन्यांनंतर पुन्हा एका राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन बुधवारी सायंकाळी पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच जेलमधून बाहेर आलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन पुन्हा या पदावर विराजमान होऊ शकतात.

झारखंड मुक्ती मोर्चासह आघाडीतील पक्षांच्या आमदारांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत बहुतेक आमदारांनी पुन्हा एकदा हेमंत सोरेन यांच्यावरच विश्वास दाखवल्याचे समजते. त्यामुळे चंपई सोरेन आपल्या पदाचा कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात.

Champai Soren, Hemant Soren
Uttar Pradesh Lok Sabha : हमें तो अपनों ने लूटा, गैरो में..! म्हणून यूपीत भाजपचा पराभव, 12 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

हेमंत सोरेन यांना ईडीने जानेवारी महिन्यात अटक केली होती. कथित भूखंड घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अटकेच्या कारवाईपुर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंपई सोरेन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. जेमतेम सहा महिनेच ते या पदावर आहेत.

झारखंड हायकोर्टाने मागील आठवड्यात हेमंत सोरेन यांना राजीनामा जामीन मंजूर केला. त्यानंतर ते जेलमधून बाहेर आले आहेत. त्यादिवसापासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा आहे. त्यावर पुढील काही तासांतच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Champai Soren, Hemant Soren
Narendra Modi : विरोधकांनी लोकसभेत केलेली मागणी मोदींनी राज्यसभेत पूर्ण केली!

चंपई सोरेन नाराज?

दरम्यान, आमदारांच्या बैठकीत चंपई सोरेन यांच्याऐवजी हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यावर आमदारांची सहमती झाली आहे. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री नाराज असल्याचीही चर्चा आहे. परिणामी, पक्षात त्यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

पुढील काही महिन्यांत झारखंड विधानसभेची निवडणूक आहे. हेमंत सोरेन यांची राज्यात अजूनही लोकप्रियता आहे. अटकेच्या कारवाईनंतर कार्यकर्त्यांमध्ये भाजपविषयी चीड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर येऊन कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश देण्यासाठी हेमंत सोरेन हे पाऊल उचलतील, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com