Himachal Pradesh Crisis : काँग्रेसचे सहा आमदार फोडून हिमाचलच्या पिचवर षटकार ठोकणारा ‘कॅप्टन’ कोण?

Captain Amarinder Singh News : अमरिंदर सिंग यांच्यावर हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटसची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राज्यसभेची अशक्यप्राय जागा निवडून आणून त्यांनी यशही मिळवलं.
Vikramaditya Singh, Sukhvinder Singh Sukhu
Vikramaditya Singh, Sukhvinder Singh SukhuSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : हिमाचल प्रदेशात राजकीय भूकंप (Himachal Pradesh Crisis) घडवत भाजपने काँग्रेस सरकारच्या अडचणी वाढवल्या. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी करत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. तसेच सरकारला पाठिंबा दिलेल्या तीन अपक्ष आमदारांनीही काँग्रेसची साथ सोडत भाजपला मदत केली. या घडामोडींनंतर सरकारच्या अडचणीही वाढल्या. या ‘ऑपरेशन लोटस’मागच्या ‘कॅप्टन’चे नाव आता समोर आले आहे.  

क्रॉस वोटिंग केलेल्या सहा नेत्यांची आमदारकी विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) आज रद्द केली आहे. या सहा आमदारांसह अपक्ष आमदार राज्यसभेच्या निवडणुकीनंतर (Rajya Sabha Election) हरयाणा राज्यातील पंचकुला येथे गेले होते. त्यांच्या जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. पंचकुलामध्ये ते दोन दिवस होते. तीन अपक्ष आमदारांशीही कॅप्टन यांचा थेटच संपर्क असल्याचे सांगितले जाते.   

Vikramaditya Singh, Sukhvinder Singh Sukhu
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या 2019 मधील पहिल्या उमेदवारी यादीत होती 'ही' सोळा नावे... 2024 मध्ये कोण?

या घडामोडींमागे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarider Singh) यांचे प्लॅनिंग असल्याचे समोर आले आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक नेत्यांशी कॅप्टन यांचे जवळचे संबंध आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती. काँग्रेसचे सरकार पाडण्यात त्यांना यश आले नसले तरी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. तसेच भाजपचा राज्यसभेचा उमेदवारही निवडून आणण्यात यश मिळवले आहे.

कॅप्टन सिंग हे पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडले होते. ते जवळपास 40 वर्ष काँग्रेसमध्ये होते. सुरूवातीला नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर काही दिवसांतच भाजपमध्ये (BJP) विलीन करण्यात आला. पंजाबमध्ये काँग्रेसला तीन वर्षांपुर्वी धक्का दिल्यानंतर कॅप्टन सिंग यांनी हिमाचलमध्येही मोठा झटका दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'इंडिया टुडे'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री सिंग यांचे हिमाचल प्रदेशातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने या कामासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचा दावा पक्षाशी संबंधित एका नेत्याने केल्याचा वृत्तात म्हटले आहे. वीरभद्र सिंह यांच्या पाच मुलींपैकी एका मुलीचा विवाह कॅप्टन सिंग यांच्या नातवाशी झाला आहे.   

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाला डावलून मुख्यमंत्रिपद सुखविंदर सिंह सुक्खू यांना दिल्यापासून भाजपने ही तयारी केल्याची चर्चा आता सुरू आहे. त्यासाठी कॅप्टन सिंग यांना साकडे घालण्यात आले होते. त्याची तयारी काही महिन्यांपासून सुरू होती. काँग्रेसलाही याची कुणकुण लागली होती. पण त्यावर काहीच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Vikramaditya Singh, Sukhvinder Singh Sukhu
Congress News : हायकमांड कधीच 5 स्टार हॉटेलमधून बाहेर पडले नाहीत! काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com