Congress News : हायकमांड कधीच 5 स्टार हॉटेलमधून बाहेर पडले नाहीत! काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

Inder Dutt Lakhanpal News : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे इंदर दत्त लखनपाल यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.
Inder Dutt Lakhanpal
Inder Dutt LakhanpalSarkarnama
Published on
Updated on

Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेशाती राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या धक्कादायक पराभवानंतर अनेक नेत्यांनी उघडपणे बोलण्यास सुरूवात केली आहे. मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. काँग्रेसमधील (Congress News) दोन गटांतील वाद उफाळून आल्याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या सहा जणांची आमदारकी विधानसभा अध्यक्षांनी रद्द केली आहे.

आमदारकी (MLA) रद्द झालेल्या सहा जणांपैकी इंदर दत्त लखनपाल (Inder Dutt Lakhanpal) यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला. बंड केल्यानंतर पहिल्यांदाच लखनपाल यांनी सोशल मीडियातून (Social Media) आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. राज्याबाहेर उमेदवार दिल्याने त्याविरोधात मतदान केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांनीही काल मीडियाशी बोलताना हीच भूमिका मांडली होती.

Inder Dutt Lakhanpal
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या 2019 मधील पहिल्या उमेदवारी यादीत होती 'ही' सोळा नावे... 2024 मध्ये कोण?

काय म्हणाले लखनपाल?

फेसबुक पोस्टमध्ये लखनपाल यांनी म्हटले आहे की, 42 वर्षे मी माझ्या रक्त आणि घामाने काँग्रेस (Congress) रुजवली. चार माणसे जमवणे अवघड असताना सेवादलात आलो. आपली जमीन विकून सेवादल चालवले. शिपायाची बदली व्हावी, यासाठी मी सचिवालयात तासनतास धडपड करायचो. मी मंत्री होण्याचा विचार कधी करणार? मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितले, साहेब आमचे कार्यकर्ते खूप संतापले आहेत. त्यांची छोटी कामेही होत नाहीत. पण दखल घेतली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मला राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) सिंघवी यांना मत देण्यास सांगण्यात आले होते. राज्यातीलच व्यक्तीला राज्यसभेवर पाठवा, असे मी सांगितले. तुला विचारत नाही, सांगतोय, असे मला बोलण्यात आले. ठीक आहे, माझाही आदर करू नका, पण ज्या कामगारांनी 25 वर्षे लाठ्या काठ्या घेऊन काम केले, त्यांना कसे वागवले गेले ते पहा. प्रत्येक वेळी मला अपमानित करण्यात आले. मी हायकमांडला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण आमचे हायकमांड कधीच 5 स्टार हॉटेलमधून बाहेर पडले नाहीत, असा निशाणा लखनपाल यांनी साधला.

माझ्या 42 वर्षांच्या राजकीय वाटचालीत मला कधीच इतकी निराशा वाटली नाही. पण एका गोष्टीचा दिलासा आहे, तो म्हणजे आपल्याच राज्यातील व्यक्तीला मतदान केले. जनतेचे हित लक्षात घेऊन मी माझे मत दिले. आज आमची हकालपट्टी झाली आहे, आता आम्ही मिळून पुढील रणनीती ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Inder Dutt Lakhanpal
Kamal Nath News : मी तुम्हाला सोडायला तयार! कमलनाथ काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बेधडक बोलले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com