Congress News : काँग्रेसचे भवितव्य विधानसभा अध्यक्ष अन् शिवकुमारांच्या हाती...

Himachal Pradesh Political Crisis : हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले आहेत. त्यानंतर काँग्रेसची सत्ता जाणार की राहणार, याची चर्चा आहे.
Congress Leader D K Shivakumar
Congress Leader D K ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

Shimla News : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या (Congress) सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने उत्तरेकडील एकमेव राज्यही हातून जाण्याची भीती पक्षाला सतावू लागली आहे. अर्थसंकल्प मंजूरीवेळीच सरकारकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट होईल, असा दावा भाजपने केल्यानंतर काँग्रेसने पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते डी. के. शिवकुमार यांच्यावर मोदी जबाबदारी सोपवली आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांवरही पक्षाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. 

भाजपचे (BJP) उमेदवार हर्ष महाजन यांनी हिमाचल प्रदेशातील एकमेव राज्यसभा जागेवर विजय मिळवत इतिहास घडवला आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांचा पराभव झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे संख्याबळ 40 असतानाही सिंघवी यांना केवळ 34 मते मिळाली. तर भाजपकडे केवळ 25 आमदार असताना 34 मतांचे गणित जुळवून आणले.

Congress Leader D K Shivakumar
Rajya Sabha Election 2024 : उत्तर प्रदेश अन् हिमाचलमध्ये 'इंडिया'ला धक्का; कर्नाटकात काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी

काँग्रेसच्या सहा आमदारांसह तीन अपक्षांची साथ भाजपला मिळाली. दोघांची मते समान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. त्यातही भाजपनेच बाजी मारली. त्यानंतर काँग्रेसचे सरकार (Congress Government) कोसळण्याची चर्चा सुरू झाली आहे. आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला जाणार असून त्याच्या मंजुरीवेळीच सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे काँगेसकडून डॅमेज कंट्रोल सुरू करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसकडून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांना हिमाचलमध्ये पाठवले आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांना एकसंध ठेवण्याची तसेच नाराज नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवकुमारांना किती यश मिळणार, हे एक-दोन दिवसांतच स्पष्ट होईल.

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय महत्वाचा

काँग्रेसकडून सहा बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. तसेच अर्थसंकल्प मंजुरीवेळी आपलेही काही आमदार निलंबित करण्याची भीती भाजपला आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षांचा (Assembly Speaker) निर्णय महत्वाचा ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे असल्याने भाजपला ही भीती सतावत आहे. भाजपने अध्यक्षांकडे बहुमत चाचणीची मागणी केली होती. पण ती फेटाळल्याने भाजपने राज्यपालांची भेट घेत त्यांना विनंती केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार तरणार की जाणार, हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल.

Congress Leader D K Shivakumar
Congress News : आसाममधील अख्खी काँग्रेस भाजपच्या वाटेवर; मंत्र्यांनीच टाकला बॉम्ब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com