Congress News : आसाममधील अख्खी काँग्रेस भाजपच्या वाटेवर; मंत्र्यांनीच टाकला बॉम्ब

Congress MLA News : आसाममध्य काँग्रेसचे 27 आमदार असून त्यापैकी काही दोन आमदारांनी नुकतेच भाजप सरकारला उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे.
Pijush Hazarika
Pijush HazarikaSarkarnama
Published on
Updated on

Assam News : काँग्रेसच्या (Congress News) भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर राहुल गांधींसह काँग्रेसच्या इतर नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधींमध्ये जोरदार शाब्दीक चकमक सुरू आहे. त्यातच आता सरमा यांच्याकडून आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. 

आसाम काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह यांनी पत्राद्वारे भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून (BJP) ऑपरेशन लोटस अंतर्गत काँग्रेसचे आमदार आणि इतर सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आसाम सरकारमधील (Assam Government) मंत्री पिजूष हजारिका (Pijush Hajarika) यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Pijush Hazarika
Bihar Political News : पलटी नितीश कुमारांची अन् भाजपकडून ‘खेला’; तीन आमदारांना फोडले

चार आमदार वगळता आसाम काँग्रेसचे सर्व आमदार आणि अनेक नेते भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षांतर करतील, असा दावा हजारिका यांनी केला आहे. जितेंद्र सिंह यांच्या पत्राला उत्तर देताना ते म्हणाले, रकीबुल हुसैन, रेकीबुद्दीन अहमद, जाकीर हुसेन सिंकदर आणि नुरूल हुदा (सर्व काँग्रेस आमदार) यांना सोडून आसाम काँग्रेसमधील इतर सर्व नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. लवकरच इतर पक्षांमध्ये प्रवेश करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचे 29 आमदार निवडून आले होते. त्यांनी काही दिवसांतच दोन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठीत देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या काँग्रेसकडे 27 आमदार आहेत. त्यापैकी दोन आमदारांनी नुकतेच सरमा सरकारला उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. त्याआधाही दोन आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला होता.

लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024) काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजप सरकारला पाठिंबा देऊ शकतात. दोन आमदारांना काँग्रेसने यापूर्वीच निलंबित केले आहे. आता भाजप नेत्याने उघडपणे काँग्रेसला चॅलेंज दिल्याने आसाममध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत.

Pijush Hazarika
Lok Sabha Election 2024 : आपचा दिल्लीत माजी खासदारासह आमदारांवरच भरवसा; उमेदवारांची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com