Himachal Pradesh Results : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत आता जवळजवळ चित्र स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री असलेले जयराम ठाकूर सहाव्यांदा विजयी झाले आहेत. पण, जयराम सरकारमधील मंत्र्यांना पराभवाचा स्विकारावा लागला. तंत्रशिक्षण मंत्री राम लाल मार्कंडा लाहौल- स्पिती मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे.
हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी सिमला ग्रामीण मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले आहेत, निवडणुक आयोगाच्या वेबसाईटनुसार विक्रमादित्य सिंह यांना 34334 मते मिळाली आहेत, तर त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे रवी कुमार मेहता यांना केवळ 21409 मते मिळाली आहेत.यामुळे सिंग यांचा दणदणीत विजय झाला आहे.
आता हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या केवळ 12 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. उर्वरित 55 जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. काँग्रेसने आतापर्यंत 34 जागा जिंकल्या असून बहुमताच्या जवळपास आहे, तर 5 जागांवर आघाडीवर आहे. आता काँग्रेसला पूर्ण बहुमतासाठी फक्त 1 जागा आवश्यक आहे. काँग्रेसच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, हिमाचलचे निवर्तमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर थोड्याच वेळात राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.