Himachal Pradesh : कोण होणार हिमाचलचा मुख्यमंत्री? प्रतिभा सिंह शर्यतीतून बाहेर, 'या' तीन नावांवर चर्चा!

Himachal Pradesh : दोन दोन पोटनिवडणुकींचा धोका काँग्रेस पत्करणार नाही.
Himachal Pradesh :
Himachal Pradesh : Sarkarnama
Published on
Updated on

Himachal Pradesh : काँग्रेस पक्षाची हिमाचल प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. काल (दि.९ डिसें) झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेस श्रेष्ठींच्या काही नावांवर विचार केल्याचे समजते. हिमाचल प्रदेशची धुरा सांभाळण्याच्या शर्यतीत तीन नावे पुढे आहेत. हिमाचल काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू, मुकेश अग्निहोत्री आणि राजिंदर राणा या शर्यतीत आहेत.

हिमाचल प्रदेशसाठी मुख्यमंत्री निवडणे काँग्रेससाठी सोपे नाही. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह या शर्यतीतून बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रतिभा सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हिमाचलमध्ये निवडणूक लढवली होती. हिमाचल काँग्रेस अध्यक्षांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. प्रतिभा सिंह यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत काँग्रेसच्या शिमला मुख्यालयाबाहेर त्यांच्या समर्थक मोठ्या संख्येने जमले.

पोटनिवडणुकांचा धोका :

काँग्रेस हायकमांडच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुखविंदर सिंग सुखू, मुकेश अग्निहोत्री आणि राजिंदर राणा हे तीनच नेते आहेत. मुख्यमंत्री आमदारांपैकीच असतील. प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री केल्यास दोन पोटनिवडणुका घ्याव्या लागतील, असे हायकमांडला वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एक लोकसभेसाठी आणि दुसरा विधानसभेसाठी. यावर तोडगा म्हणून प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांना मंत्रिमंडळात मोठे पद दिले जाऊ शकते.

Himachal Pradesh :
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील म्हणजे, उचलली जीभ अन् लावली टाळ्याला...

मंडी पोटनिवडणूक सोपी होणार नाही :

मंडीतील 10 पैकी 9 जागांवर काँग्रेसचा पराभव झाले आहे. अशा स्थितीत पोटनिवडणूक तातडीने घेणे परवाडणारे नाही. निवडणूक जिंकून निर्माण झालेले वातावरण कुठेतरी बिघडू शकते. मुलगा विक्रमादित्य सिंग यांना मंत्रिमंडळात उच्चपद देऊन प्रतिभा सिंह यांचे मन वळवता येईल.

याआधी शुक्रवारी, हिमाचल प्रदेशमधील नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्रिपदाची निवड करण्याचा निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोडण्याचा ठराव मंजूर केला आणि दिल्लीतच मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल, हे स्पष्ट झाले. एआयसीसीचे राज्य प्रभारी राजीव शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.

Himachal Pradesh :
Himachal Pradesh : मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये मोठे घमासान : सिंह समर्थकांची घोषणाबाजी; सुखविंदर सिंग समर्थक आमदारांची बैठक

पक्ष फुटीच्या अफवा :

राजीव शुक्ला म्हणाले, "आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व 40 आमदारांनी हजेरी लावली आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोडण्याचा ठराव एकमताने मंजूर केला." पक्षांतर्गत फूट असल्याच्या बातम्या मीडियातून येत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहे.

एकाही आमदाराने नाव सुचवले नाही. "सर्व आमदारांनी एकमताने मुख्यमंत्री निवडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपवावा, असा ठराव संमत केला. उद्या आम्ही आमचा अहवाल पक्षप्रमुखांना सादर करू," असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com