New Parliament Building News : देशाला आज लोकशाहीचं नवं मंदिर मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येत आहे.. आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे अवघ्या देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेन्ट्रल व्हिस्टामध्ये संसद भवन आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपकडून वतीने जय्यत तयारी करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणावेळीही मोदी सरकारनं सर्वधर्म समभावाचं अचूक टायमिंग साधलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये मोदींना सेंगोल (Sengol) म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेनं झाली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटना(New Parliament Building Inauguration) त छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही मोठी काळजी घेण्यात आली आहे. या बाबतीत सेंगोल लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ठेवल्यास सेंगोलच्या वरचा नंदी पूर्व-पश्चिम दिशेला असेल. सेंगोलची प्रतिष्ठापना केल्यानंतर दीपप्रज्वलन आणि सेंगोलच्या फुलांचे पूजन पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संसद भवनाच्या उद्घाटनासंदर्भात अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही संसद भवनात उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन इमारतीच्या उद्घाटनापूर्वी महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली. सकाळी सव्वासातच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळ्यात आधी संसद भवन संकुलात असलेल्या गांधी मूर्तीजवळ बांधलेल्या विशेष मंडपामध्ये सकाळी साडेसात वाजता पूजा आणि हवनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तामिळनाडूच्या पुरोहितांनी पंतप्रधान मोदींना राजदंड सुपूर्द केला, जो त्यांनी संसद भवनात स्थापित केला.
संसदेच्या नवीन इमारतीत सर्वधर्म प्रार्थना सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदि नेते उपस्थित आहेत. यावेळी बौद्ध, जैन, पंजाबी, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू आदि सर्वधर्म प्रार्थना सोहळा पार पडत आहे.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या हाताला मंत्रोच्चारात सेंगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पंतप्रधांनांनी सर्व सांधूसंत आणि धार्मिक गुरुंना अभिवादन केलं.
त्यानंतर त्यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं.पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीयांकडुन प्रार्थना करण्यात आली आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह(Amit Shah) संसद भवनात पोहोचले असून उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त कोणताही गडबड होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनात देशातील एकूण 25 राजकीय पक्ष सहभागी होत आहेत, तर काँग्रेससह 21 राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.