
New Delhi News : कोरोनाच्या महामारीनंतर पुन्हा एकदा HMPV या विषाणूने भीतीचे सावट निर्माण केले आहे. चीनमध्ये या विषाणूचे हजारो रुग्ण आढळून आले असून भारतातही या विषाणुचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनीही याबाबत महत्वाची माहिती दिली.
नड्डा यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. हा नवीन विषाणू नाही. पहिल्यांदा 2001 मध्येच या विषाणुची माहिती समोर आली होती. सध्या सर्व आवश्यक पावले उचलली जात असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात आतापर्यंत कर्नाटकात दोन, गुजरातमध्ये एक आणि कोलकाता येथे एका व्यक्तीला या विषाणूचे संक्रमण झाले आहे.
तज्ज्ञांचा हवाला देत जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, HMPV हा अनेक वर्षांपासून संपूर्ण जगात पसरलेला आहे. हा विषाणू श्वसनाद्वारे हवेच्या माध्यमातून पसरतो. सर्व वयोगटातील लोकांना संक्रमण होते. थंडी आणि ऋतू बदलण्याच्या सुरूवातीच्या महिन्यात या विषाणू संक्रमण अधिक होते.
आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र चीनसह शेजारील देशांतील स्थितीवर करडी नजर ठेऊन आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चार जानेवारीला बैठक झाली होती. देशातील आरोग्य यंत्रणा आणि नियंत्रण नेटवर्क सतर्क आहे. कोणत्याही आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी देश सज्ज आहे. काळजी करू नये. आम्ही बारकाईन लक्ष ठेऊन आहोत, असे नड्डा यांनी सांगितले.
1. बेंगलुरू येथील दोन लहान मुलांना या विषाणुचे संक्रमण झाले आहे. एक मुल तीन महिन्यांचे तर दुसरे आठ महिन्यांचे आहे. या मुलावर उपचार सुरू आहेत.
2. कोलकाता येथे नोव्हेंबर महिन्यात एका सहा महिन्याच्या मुलाला या विषाणुचा संसर्ग झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासूनच भारतात हा विषाणू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
3. अहमदाबादमध्ये दोन महिन्यांचा मुलगा बाधित झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.