Crime News : होळीच्या रंगात रक्ताचा सडा! भरदिवसा कुऱ्हाडीचे सपासप वार, 3 महिलांसह एकाचा जागीच मृत्यू

Holi festival violence : होळीच्या सणादिवशी भरदिवसा कुऱ्हाडीच्या सपासप वारात 3 महिलांसह एकाचा मृत्यू. धक्कादायक घटनेची सविस्तर माहिती वाचा.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

होळीच्या सणाच्या आनंदावर पाणी फेरत धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेश मधील बहराइच तालुक्यातील बसंतपूर उदल या गावात मध्यरात्री एका कुटुंबावर कुऱ्हाडीने भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. कौटुंबिक वादातून ही रक्तरंजित घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. कुटुंबीय घरात झोपेत असताना अचानक हल्लेखोराने कुऱ्हाडीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. घरातून अचानक किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागल्याने शेजारी जागे झाले. मात्र लोक घटनास्थळी पोहोचेपर्यंत घराच्या अंगणात आणि खोलीत सर्वत्र रक्त सांडलेले होते. दृश्य इतके भीषण होते की गावकऱ्यांनाही धक्का बसला.

Crime News
Pune PMC : 'महापौरांना मिळते, मग मला का नाही?' ‘त्या’ एका सवलतीवरून उपाध्यक्ष उमेदवार अन् अधिकाऱ्यांत जुंपली; पाहा काय घडलं!

या हल्ल्यात शीतला देवी (वय 82), संजू देवी (वय 60), पार्वती (वय 20) आणि बदलूराम (वय 62) यांचा मृत्यू झाला. घराच्या अंगणात एका बाजूला पती-पत्नी तर दुसऱ्या बाजूला आई आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये गुरुदेव (वय 40) आणि निरंकर (वय 30) यांचा समावेश आहे. दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर निरंकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी लखनऊ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक व मालमत्तेच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. आरोपी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

Crime News
March 1 New Rules : 1 मार्चपासून रेल्वे, UPI अन् गॅस सिलिंडरच्या भावात बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

फॉरेन्सिक पथकाने घराच्या आत आणि बाहेर सखोल तपास करून विविध पुरावे गोळा केले. हल्ल्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली आहे. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या आणि सर्वत्र रक्ताचे डाग दिसत होते. वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादामुळे परिस्थिती चिघळत गेली आणि अखेर त्याचे रूपांतर या भीषण हत्याकांडात झाले, अशी चर्चा गावात सुरू आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com