Harish Salve on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर..; सत्तासंघर्षावर हरीश साळवेंचा मोठा खुलासा!

Harish Salve News| शेवटच्या दिवशी दोन गोष्टी घडल्या.
Advocate Harish Salve on Supreme Court Judgment :
Advocate Harish Salve on Supreme Court Judgment : Sarkarnama

Advocate Harish Salve on Supreme Court Judgment : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी (११ मे) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा आम्ही मुख्यमंत्रीपदी आणलं असतं. पण, ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकाल वाचताना सांगितले होते. (If Uddhav Thackeray had not resigned Harish Salve's big revelation on the power struggle!)

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी भाष्य केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. "शिवसेनेतून एक गट फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता आणि बहुमताच्या चाचणीला सामोरे गेले असते तरी त्यांचं सरकार पडलचं असतं", असं हरीश साळवे यांनी म्हटलं आहे. (Supreme Court On Maharashtra Political Crisis)

Advocate Harish Salve on Supreme Court Judgment :
Pimpri Crime News : मावळ पुन्हा हादरले, तळेगाव नगरपरिषद कार्यालयासमोर भरदिवसा आवारेंची निर्घृण हत्या

साळवे म्हणाले, "दिवसाच्या शेवटी दोन गोष्टी घडल्या. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेसाठी दावा केला. राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सभागृहात बहुमताची चाचणी झाली आणि एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं". (Maharashtra Politics)

"शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर बहुमताच्या चाचणीला सामोरे न जाता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा स्थापन करु शकत नाही, हे सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निकालात स्पष्ट केलं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील". (Uddhav Thackeray)

Advocate Harish Salve on Supreme Court Judgment :
Rahul Narwekar : ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर नार्वेकरांची भूमिका; म्हणाले, लवकरात लवकर म्हणजे विशिष्ट कालमर्यादा...

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती वेगळी असती का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना साळवे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना बहुमताच्या चाचणीसाठी बोलवले असते तरीही ते बहुमत सिद्ध करु शकले नसते आणि पराभूत झाले असते", असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com