Shashi Tharoor News : शशी थरूर यांचे ‘शशी’ हे नाव का ठेवले? महाशिवरात्रीशी आहे कनेक्शन...

Congress Political News Congress Politics Shashi Tharoor controversy : मागील काही दिवसांत शशी थरूर यांच्या काँग्रेसमधील नाराजीवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Shashi Tharoor
Shashi TharoorSarkarnama
Published on
Updated on

Maha Shivratri News : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या काही विधानांमुळे सध्या राजकीय वादळ उठले आहे. पक्षावरील त्यांची नाराजी समोर आली असून आपल्यासमोर अन्य पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे सोशल मीडियातही ते सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. आता त्यांच्या ‘शशी’ या नावावरूनही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

देशभरात महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त शशी थरूर यांनीच आपल्या नावामागचे रहस्य सांगितले आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘शशी’ या नावाशी महाशिवरात्रीशी कनेक्शन आहे. थरूर यांच जन्म महाशिवरात्रीला झाला होता. त्यावरून हे नाव पडल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Shashi Tharoor
Karnataka Assembly: विधीमंडळ सभागृहात आमदार घेणार सिनेमा हॉल चा ‘फील’; अध्यक्षांच्या निर्णयाचे कौतुक

थरूर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझा जन्म महाशिवरात्रीला झाला होता. भगवान शंकराच्या माथ्यावरील चंद्रकोर पाहून माझे नाव ‘शशी’ ठेवण्यात आले. केरळ कॅलेंडरनुसार माझा नक्षत्रानुसारचा वाढदिवस आज आहे. त्यामुळे हा दिवस माझ्या कुटुंबासाठी नेहमीच खास असतो, असे थरूर यांनी म्हटले आहे.

25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप.

थरूर यांच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांच्याही त्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने त्यांना तुम्ही चुकीच्या पक्षात असल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्याही दिल्या आहेत. ‘आज कोणता महत्वाचा निर्णय घेणार?,’ अशी प्रतिक्रियाही एकाने दिली आहे.

Shashi Tharoor
Pramod Sawant : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मराठी राजभाषा दर्जाच्या मागणीला बगल?स्पष्टीकरण देत म्हणाले, 'कोकणी राज्यभाषा तर'

नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रियांमागे थरूर यांच्या मागील काही विधानांचा संदर्भ आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या एक्सवरील प्रत्येक पोस्टची नेटकऱ्यांकडून चिरफाड केली जात आहे. मंगळवारी (ता. 25) त्यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com