

PM Kisan Samman Nidhi : सध्या देशभरातील लाखो शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत – "किसान सन्मान निधीचे पैसे खात्यावर कधी येणार?" किसान सन्मान योजनेच्या २०व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नसली, तरी असा अंदाज आहे की हप्ता जून महिन्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नसली तरी किसान सन्मान योजनेबाबत, अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडत असेल की यावेळी त्यांना पैसे मिळतील की नाही! त्याचे नाव यादीतून वगळले आहे का? हे तपासणं फारच सोपं आहे!
हे तपासणं फारच सोपं आहे! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अधिकृत पोर्टलवर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी उपलब्ध आहे. जूनमध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील की नाही हे तुम्ही स्वतः शोधू शकता. संपूर्ण यादी सरकारने अधिकृत पोर्टलवर अपलोड केली आहे. तुम्ही तुमचे नाव अगदी सहजपणे तपासू शकता.
जर तुमचे नाव या यादीत असेल, तर तुम्हाला किसान सन्मान निधी अंतर्गत 6000 रुपयांचा पुढील हप्ता मिळेल. जून असो किंवा जुलै, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर किंवा बँक खात्याचा तपशील वापरून लॉगिन करायचं आहे. तिथे तुम्ही सहजपणे तपासू शकता की तुमचं नाव यादीत आहे की नाही.
सर्वप्रथम तुम्ही अधिकृत पोर्टलवर जा.
येथे तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल.
आता स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल.
यामध्ये, तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल
यानंतर, तुम्हाला जिल्हा, उपजिल्हा आणि गाव निवडावे लागेल.
नंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल.
त्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
तुम्हाला यावर्षी 6000 रुपयांचा हप्ता तीन समान टप्प्यांमध्ये मिळणार आहे. यातील पुढील हप्ता म्हणजेच 2000 रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
काही कारणांमुळे तुमचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं – जसं की आधार नंबरमध्ये चूक, KYC अपडेट न झालेली, किंवा इतर कागदपत्रांची त्रुटी. अशावेळी तुम्ही आपल्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, किंवा pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन माहिती तपासून घ्यावी.
त्याचप्रमाणे, E- KYC देखील त्वरित करा. तुमच्या बँक खात्याशी आधार लिंकिंग झाले आहे की नाही ते देखील तपासा. जर नसेल, तर बँकेत जाऊन हे कामही करून घ्या. ही सर्व कामे खूप सोपी आहेत, पण जर ही कामे केली नाहीत तर ती नक्कीच कठीण होऊ शकतात. तुमचं नाव यादीत आहे का हे वेळेवर तपासा, आणि आवश्यक असल्यास KYC तात्काळ अपडेट करा. पैसे येण्याची प्रक्रिया पारदर्शक असून सरकारकडून योग्य ते पावलं उचलली जात आहेत.