
What to Do During a Blackout: A Practical Guide : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भराताने ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवादी आणि पाकिस्तानला दणके देणं सुरू केलं आहे. या हल्ल्याच्या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध देखील कमालीचे ताणले गेले असून, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून केंद्र सरकारने देशभरात ७ मे रोजी मॉक ड्रील घेतली गेली.
गृहमंत्रालयाकडून राज्यांना मॉक ड्रीलबाबत दिल्या गेलेल्या निर्देशांमध्ये ५४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच क्रॅश ब्लॅकआउट उपायांची तरतूद देखील नमूद केली आहे. तर आता तुमच्य मनात प्रश्न निर्माण होत असेल की, ब्लॅकआउट म्हणजे नेमकं काय? याचा उत्तर म्हणजे, युद्धादरम्यान शत्रूच्या विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यांदरम्यान ब्लॅकआउट लागू केले जाते. ब्लॅकआउटचा मुख्य उद्देश शत्रूला हवाई हल्ल्यात अडथळे निर्माण करणे आहे.
ब्लॅकआउट का करावे लागते, तर याचं उत्तर असे आहे की सामान्य दृश्यमानतेच्या परिस्थितीत जमिनीपासून पाच हजार फूट उंचीवर कोणताही प्रकाश दिसू नये याची खात्री करणे, जेणेकरून शत्रूची विमाने हल्ल्यासाठी नागरी क्षेत्र पाहू शकणार नाहीत. या ब्लॅकआउटचा उद्देश, रात्रीच्या वेळी शत्रूच्या विमानांपासून लोकांना स्वत:ला आणि त्यांच्या शहरांना सुरक्षित ठेवण्यास सक्षम बनवणे आहे.
-कोणत्याही इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचा उजेड नसावा, जर असेल तर त्याला अपारदर्शी वस्तूने झाकलं जावं.
-कोणताही चमकदार लाइट इमारतीच्या छताच्या पलीकडे दिसू नये.
-इमारत किंवा तिच्या कोणत्याही भागाबाहेर वरून कोणताही प्रकाश नसावा
-कोणत्याही इमारतीबाहेर सजावट किंवा जाहिरातीसाठी कुठल्याहीप्रकारचा उजेड नसावा.
-ब्लॅकआउट दरम्यान कारमध्ये लागणारे सर्व लाइट्स स्क्रीन केले जावेत, ज्यातून बीम सोडले जातात.
-यासाठी पहिली पद्धत आहे की, काचेवर कोरडा तपकरी कागद लावावा, ज्यामुळे हलका प्रकाश निघेल
-दुसरा उपाय म्हणजे काचेच्या मागे एक कार्डबोर्ड डिस्क टाकणे, जी पूर्ण भाग कवर करेल.
-रिफ्लेक्टरला अशाप्रकारे कवर केलं गेलं पाहिजे, की रिफ्लेक्टरमधून कोणत्याही प्रकारचा लाइट निघणार नाही.
-हातात कोणत्याही प्रकारची उजेडाची वस्तू असेल तर तिला कागदाने गुंडाळावं
शत्रूंची विमानं येत असल्याचा इशारा देण्याचं काम वायू सेना करते. जसं वायू सेनेला शत्रूंची विमान येत असल्याचं दिसतं, तेव्हा तत्काळ त्याची माहिती विभागीय नागरिक सुरक्षा नियंत्रण केंद्रां पाठवली जाते. जे ती माहिती शहराच्या केंद्रांकडे पाठवतात, जे जमिनी कारवाई सुरू करतात. हवाई हल्ल्याचा इशारा सर्वसामान्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी संधी देतो.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.