
PM Modi’s Subtle Signal Before the Operation : भारताने पहलगाम दहशवतवादी हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूर राबवून जबरदस्त बदला घेतला आहे. भारताच्या सैन्याने धाडसी एअर स्ट्राईक करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केली आहेत. भारताच्या या करावाईमुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. तर जगभरातून भारतीय सैन्याचे कौतुक होत आहे.
खरंतर पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे हल्ला केला, त्यानंतर संपूर्ण देशभरात प्रचंड संताप होता. सर्वसमान्यांपासून ते अगदी राष्ट्रपतींपर्यंत सर्वांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत, पाकिस्तानला योग्य धडा शिकवला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती.
तर पंतप्रधान मोदींनीही या हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल असे प्रत्युत्तर दिले जाईल, असं सांगत कडक इशारा दिला होता. शिवाय, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच महत्त्वपूर्ण व्यक्तींनीही तशाचप्रकरचा इशारा दिलेला होता. त्यामुळे भारत नेमका बदला कधी आणि कसा घेणार याची सर्व भारतीयांना प्रतीक्षा होती. तर भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानला धडकी भरलेली होती. भारत कधीही हल्ला करू शकतो, आम्ही देखील सज्ज आहे, असं पाकिस्तानच्या पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांकडूनच सांगितलं जात होतं.
मात्र भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेलं ऑपरेश सिंदूर बाबत कुणालाही किंचतही भनक लागली नाही. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून पाकिस्तानवर हल्ला होण्याच्या चार तास आधी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलता बोलता संकेतही दिल्याचं आता बोललं जात आहे. मात्र मोदींचा बोलण्यातील तो संकेत कुणालाही कळलाच नाही आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पडल्यानंतर संपूर्ण जगाला मोदींच्या त्या वाक्याचा अर्थ समजला, ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘’मी पुन्हा एकदा या समिटसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ‘मलाही...’ असं म्हणून मोदी एक क्षण थांबले. त्यानंतर लगेचच ‘आता, रात्री उशीर होणार आहे आणि तरीही तुम्ही इतक्या मोठ्यासंख्येत या ठिकाणी उपस्थित आहात, ही देखील एका उज्वल भविष्याची निशाणी आहे.’’ असं म्हणून मोदींनी कुणाला काहीच पत्ता लागू दिला नाही. यानंतर मोदी पीएमओ कार्यालयात परतले आणि काही वेळातच भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.