Rahul Gandhi news : राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रख्यात महिला IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; भाजप नेत्याकडून गंभीर आरोप

Uttar Pradesh IAS news, Divya Mittal resignation, BJP : प्रशांत उमराव यांच्या या पोस्टमुळे दिव्या मित्तल राजकारणात प्रवेश करणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
Rahul Gandhi, Divya Mittal
Rahul Gandhi, Divya MittalSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi latest news : उत्तर प्रदेशातील प्रख्यात आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी सेवेचा राजीनामा दिला असल्याचे रविवारी जाहीर केले. त्यांनी सोशल मीडियात एक भावनिक पोस्ट करत आत मी १३ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास स्वइच्छेने थांबवत IAS राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मित्तल यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियात आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

भाजपचे प्रवक्ते प्रशांत उमराव यांनी मित्तल यांच्या राजीनाम्यामागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करत मित्तल आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मित्तल यांच्या नावाचा उल्लेख न करत उमराव यांनी त्यांना घेरले आहे.

उमराव यांनी म्हटले आहे की, एका IAS अधिकाऱ्याच्या राजीनाम्याचा जोरदार पीआर केला जात आहे. मात्र, रात्रीच्या अंधारात राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राजीनामा दिला. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी हा राजीनामा दिल्याचे सांगितले जात नाही. त्यांची नेहमीच राजा बनून राहण्याची इच्छा होती, त्यामुळे त्यांना संयुक्त सचिव पद पसंत पडले नाही. त्यांना जिल्हाधिकारी पदानंतर थेट आयुक्तपद हवे होते.

Rahul Gandhi, Divya Mittal
Top 10 News : खासदाराने जाहीर केली राजीनाम्याची तारीख, संजय जाधवांना मनोज जरांगेंचं आव्हान, दोन केंद्रीय मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर... वाचा Top Ten राजकीय घडामोडी

मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे श्रेय स्वतःला देत उद्घाटन केले जात होते. स्थानिक खासदारालाही बोलावले जात नव्हते. इतकी PR करण्याची हौस होती. कोणत्याच जिल्ह्यात त्यांचे लोकप्रतिनिधींसोबत पटले नाही. त्यांच्या पतीने यापूर्वी खासगी नोकरी केली होती. मात्र, त्या ‘राजा’ बनल्यानंतर पती दलालीच्या व्यवसायात उतरले अन् कोट्यवधी जमा केले, असा गंभीर आरोप उमराव यांनी केला आहे.

Rahul Gandhi, Divya Mittal
MP resignation news : पक्षाच्या अध्यक्षांनी दिलेलं आव्हान खासदारानं स्वीकारलं; थेट राजीनाम्याची तारीखच जाहीर केली, पक्षालाही रामराम ठोकणार...

दरम्यान, उमराव यांच्या या पोस्टमुळे दिव्या मित्तल राजकारणात प्रवेश करणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे. भाजप विरुध्द समाजवादी पार्टी असा थेट सामना या निवडणुकीत होणार आहे. सध्यातरी राज्यात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी आहे. त्यामुळे दिव्या मित्तल या आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com