IAS Officers Inquiry: पूजा खेडकरला दिलासा, तर दुसरीकडे एकाचवेळी 11 IAS, 2 IPS, 1 IFS अन् 1 IRS अधिकाऱ्यांची चौकशी सुरू, प्रशासनात खळबळ

Central Government News : पूजा खेडकरवरही अशाच प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले होते. एकीकडे काही दिवसांपूूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा मिळाला असतानाच आता दुसरीकडे पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेतील अतिशय टॉपची आणि खडतर यूपीएससीच्या सेवेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांबाबत मोठी कारवाई सुरू केल्यानं खळबळ उडाली आहे.
IAS And IPS officers  .jpg
IAS And IPS officers .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मागील काही दिवसांपासून माजी प्रशिक्षणार्थी वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रचंड चर्चेत आहे. पूजावर सातत्याने गंभीर आरोप सुरू असून तिचे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. याचवेळी पूजाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. याचवेळी आता प्रशासनातून मोठी खळबळजनक माहिती समोर येत आहे.

नागरी सेवा परीक्षेतील उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याच्या तक्रारींची डीओपीटीकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याचदरम्यान ,11 आयएएस (IAS), 2 आयपीएस, 1 आयएफएस आणि 1 आयआरएस अधिकाऱ्यांची एकाचवेळी चौकशी सुरू केल्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून आता 2015 ते 2023 या कालावधीतील सिव्हिल सेवा परीक्षेबाबत धक्कादायक बाब उघड झाली आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या काही उमेदवारांनी राखीव प्रवर्गासाठी बोगस प्रमाणपत्रांचा वापर केल्याच्या आरोप करण्यात आले होते. त्याचमुळे डीओपीटीनं आता याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

बोगस प्रमाणपत्रांच्या वापरप्रकरणी आता डीओपीटीनं राजस्थान,उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा,महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांशी चौकशीसाठी संपर्क केला आहे. याचवेळी गृह मंत्रालय,महसूल विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडेही याप्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे.

IAS And IPS officers  .jpg
Sushma Andhare On Chitra Wagh: सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातूनच वाघांवर हल्ला चढवला; म्हणाल्या,'बाई सोयीनुसार...'

याबाबत 'यूपीएससी'नं (UPSC) केलेल्या तक्रारीनंतर केंद्र सरकारचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग अलर्ट झाला आहे. या विभागानं केंद्रासह राज्य सरकारच्या मंत्रालयांना संबंधित उमेदवारांच्या प्रमाणपत्र तपासण्याबाबतचे कठोर सूचना केल्या आहेत. यामुळे 11 आयएएस, 2 आयपीएस, 1 आयएफएस आणि 1 आयआरएस अधिकाऱ्यांच्या भोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी याबाबत तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी अनुसूचित जाती (SC), इतर मागासवर्गीय -नॉन क्रिमीलेअर (OBC-NCL),आर्थिक दुर्बल घटक (EWS), दिव्यांग (PwBD) तसेच अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील सवलती मिळवण्यासाठी सादर केलेल्या प्रमाणपत्राबाबत संशय व्यक्त केला होता.

IAS And IPS officers  .jpg
Vaishnavi Hagawane Case: 'वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची अन् तिचे...'; हगवणे कुटुंबाच्या वकिलांचा कोर्टात खळबळजनक दावा

विजय कुंभार यांनी सातत्यानं पाठपुरावा करत हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं होतं.यावेळी त्यांनी एकूण 22 उमेदवारांची यादी तपासणीसाठी दिली होती अशीही माहिती समोर आली आहे. त्यापैकी आता 15 उमेदवारांबाबत कठोर कारवाई सुरू केली आहे.

संबंधित उमेदवार हे सध्या IAS, IPS, IFS आणि IRS सारख्या उच्च प्रशासकीय सेवेत कार्यरत आहे. पूजा खेडकरवरही अशाच प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले होते. एकीकडे काही दिवसांपूूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा मिळाला असतानाच आता दुसरीकडे पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेतील अतिशय टॉपची आणि खडतर यूपीएससीच्या सेवेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांबाबत मोठी कारवाई सुरू केल्यानं खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com