Vijay Wadettiwar : हिवाळी अधिवेशनावरून वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात; म्हणाले...

Maharashtra Winter Session : राज्यातील प्रश्नांना बगल देऊन दहा दिवसांत अधिवेशन गुंडाळणार
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : नागपूरचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाचे २० डिसेंबरपर्यंतच्या कामकाजाची तात्पुरती यादीही तयार करण्यात आली आहे. याबाबत विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. मात्र, दहा दिवसांच्या अधिवेशनातून सरकार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रश्नांची त्यांना उत्तरे द्यायची नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबरपर्यंत होणार आहे. या अधिवेशनाच्या कामकाजाची तात्पुरती यादीही तयार झालेली आहे. दरम्यान, अधिवेशन कधी सुरू करायचे, याबाबत मोठी खल झाली होती. अधिवेशन ७ की ११ डिसेंबरपासून सुरू करायचे असा तेढ होता. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा प्रश्न सुटला आहे. त्यानुसार अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने सरकारच्या हेतूवरच वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Vijay Wadettiwar
Thackeray Group: ठाकरेंनी फुटीरांविरुद्ध रान पेटवले, मात्र 'टेम्पो' टिकवण्याचे आव्हान...

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, 'दहा दिवसांचे कामकाज ठरलेले आहे. राज्यात खूप प्रश्न आहेत. त्यामुळे हे अधिवेशन १५ दिवस चालण्याची अपेक्षा होती. शेतकरी, शेतमजूर, आरोग्यापासून भ्रष्टाचारसारख्या अनेक प्रश्नांनी राज्याला घेरले आहे. यावर सविस्तर चर्चा होणे गरजेची आहे. अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाच्याही झळा त्यांनी सोसल्या आहेत. त्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका होती. मात्र, बहुमताच्या जोरावर सरकार एककल्ली कारभार करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे,' असा आरोप वडेट्टीवारांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'दहा दिवसांचे अधिवेशन होणार असल्याने हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर नसल्याचे दिसून येते. हे अधिवेशन १५ दिवस वर्किंग डे असायला हवे होते, अशी मागणी होती. आता लोकांना न्याय देण्याची सरकारची भूमिका नाही. लोकांच्या प्रश्नांना बगल देऊन आरक्षणाचा मुद्दा चव्हाट्यावर आणून भ्रष्टाचाराचे कुरण चरण्यात सरकार मश्गूल आहे, तीच नीती दहा दिवसांत असल्याची दिसते,' असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला आहे. (Latest Political News)

अधिवेशनात राज्यातील प्रश्नांना न्याय मिळणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. 'पुरवण्या मोठ्या प्रमाणात आहेत. पुढील अधिवेशन होणार की नाही, याची शाश्वती नाही. बजेटपुरती दोन दिवसांची चर्चा होईल. आता राज्यातील प्रश्नांवर चर्चा होऊच द्यायची नाही, अशी सरकारची भूमिका आहे. दहा दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याची सरकारची खेळी आहे,' असा आरोपही वडेट्टीवारांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Vijay Wadettiwar
Maratha Reservation Issue: मुख्यमंत्र्यांना जमले नाही, ते धाडस विखे पाटील यांनी दाखवले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com