Sharad Pawar on EVM News : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'EVM'बाबत विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक!

Meeting of opposition on EVM : ईव्हीएम विरोधात काही ठोस पुरावे नाहीत मात्र, निकालातील आकेडवारीवरून काही प्रश्न निर्माण होत असल्याचंही वक्तव्य याआधी केलं होतं.
Sharad Pawar ON EVM News.jpg
Sharad Pawar ON EVM News.jpgSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीतील पराभूत झालेल्या उमेदवारांची EVM संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीस दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि वकील अभिषेक मनू सिंघवी बैठकीला उपस्थित आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील पराभूत उमेदवार देखील उपस्थित आहेत.

या बैठकीस पोहचलेल्या नेत्यांमध्ये माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार निलेश लंके, खासदार अमोल कोल्हे, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, दत्ता बहिरट, प्रशांत जगताप, महेबुब शेख, संदीप वरपे, राहुल कलाटे, संजय जगताप, अश्विनी कदम आदी नेत्यांचा समावेश आहे.

या आधी शरद पवारांनी(Sharad pawar) सांगितलं होतं की, ईव्हीएम विरोधात काही ठोस पुरावे नाहीत मात्र, निकालातील आकेडवारीवरून काही प्रश्न निर्माण होत असल्याचंही वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "EVM वर आमची शंका नाही. कारण त्यासंदर्भातील ठोस असे पुरावे माझ्या हातात नाहीत.

Sharad Pawar ON EVM News.jpg
Sharad Pawar : EVM बाबत पुरावे नाहीत पण..., मारकडवाडीला का जाणार? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

मात्र, मतदानाच्या आकडेवारीवरून अनेक प्रश्न निर्माण होतात. काँग्रेसला (Congress) राज्यात 80 लाख मते पडून देखील त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला 79 लाख मते मिळाली असताना त्यांचे 57 आमदार विजयी झाले आहेत.

Sharad Pawar ON EVM News.jpg
V K Saxena News : दिल्लीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात आता उपराज्यपाल अ‍ॅक्शन मोडवर

म्हणजे एक लाख मते कमी मिळूनही त्यांचे 41 आमदार अधिक निवडून आले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला 72 लाख मते मिळून आमचे आमदार 10 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 58 लाख मतदान मिळूनही त्यांचे 41 आमदार निवडून आले, अशी आकडेवारी मांडत पवारांनी निकालावर संशय व्यक्त केला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com