Sharad Pawar : EVM बाबत पुरावे नाहीत पण..., मारकडवाडीला का जाणार? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

Sharad Pawar will visit Markadwadi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज मारकडवाडीला भेट देणार आहेत. हे गाव सध्या राज्यासह देशभरात चर्चेत आहे. कारण ईव्हीएमवर संशय व्यक्त करत या गावातील लोकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता.
Sharad Pawar ON EVM News.jpg
Sharad Pawar ON EVM News.jpgSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar will visit Markadwadi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी (ता.08) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी (Markadwadi) या गावाला भेट देणार आहेत. हे गाव सध्या राज्यासह देशभरात चर्चेत आहे.

कारण ईव्हीएमवर संशय व्यक्त करत या गावातील लोकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू करत अशा पद्धतीने निवडणूक घेण्यास मज्जाव केला. त्यानंतर राज्यासह देशातील विरोधकांनी ईव्हीएम विरोधातील लढ्यासाठी मारकडवाडी पॅटर्न देशभरात राबवण्याची घोषणा केली आहे.

काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी 'आय लव्ह मारकरवाडी' (I Love Markadwadi) अशा आशयाचे बॅनर सभागृहाच्या आवारात झळकावले. अशातच आता ईव्हीएम विरोधाची लाट ज्या गावातून उसळली त्या गावाला आज शरद पवार भेट देणार आहेत.

Sharad Pawar ON EVM News.jpg
Rahul Gandhi News : राहुल गांधींनी आता 'या' महत्त्वाच्या मुद्य्यावरून केले मोदी सरकारला लक्ष्य, म्हणाले...

मारकडवाजीत जायच्या आधी आपण त्या ठिकाणी का जाणार आहोत याची माहिती पवारांनी (Sharad Pawar) दिली आहे. माध्यमांशी बोलताना पवार यांनी सांगितलं की, मारकडवाडी या गावाने जुन्या पद्धतीने मतदान घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्याला प्रशासनाने बंदी घातली. त्यांना बंदी करायचे कारण काय? हा कोणता कायदा? असा प्रश्न उपस्थित करत या गावात 144 कलम लावल्याचे मला आश्चर्य वाटतं.

त्यामुळे हा सर्व प्रकार मारकडवाडीत जाऊन लोकांकडूनच समजून घेण्यासाठी आणि तेथील जे कोणी अधिकारी असतील तर त्यांचेही मत जाणून घेण्यासाठी मी मारकडवाडीला जाणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी ईव्हीएम विरोधात काही ठोस पुरावे नाहीत मात्र, निकालातील आकेडवारीवरून काही प्रश्न निर्माण होत असल्याचंही वक्तव्य केलं.

Sharad Pawar ON EVM News.jpg
Eknath Khadse Vs Fadnavis: मोठी बातमी! पुन्हा CM झालेल्या फडणवीसांसोबतचं राजकीय शत्रुत्व मिटवण्याबाबत खडसेंचं मोठं विधान

ते म्हणाले, "EVM वर आमची शंका नाही. कारण त्यासंदर्भातील ठोस असे पुरावे माझ्या हातात नाहीत. मात्र, मतदानाच्या आकडेवारीवरून अनेक प्रश्न निर्माण होतात. काँग्रेसला (Congress) राज्यात 80 लाख मते पडून देखील त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला 79 लाख मते मिळाली असताना त्यांचे 57 आमदार विजयी झाले आहेत.

म्हणजे एक लाख मते कमी मिळूनही त्यांचे 41 आमदार अधिक निवडून आले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला 72 लाख मते मिळून आमचे आमदार 10 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 58 लाख मतदान मिळूनही त्यांचे 41 आमदार निवडून आले, अशी आकडेवारी मांडत पवारांनी निकालावर संशय व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com