Income Tax Tribunal : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेस व युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला आहे. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर पक्षाकडून प्राप्तिकर लवादाकडे धाव घेण्यात आली आहे. लवादाने खात्यांवरून व्यवहार करण्यास परवानगी दिली असली तरी एक मोठी अट घातली आहे. या अटीमुळे ‘इकडं आड तिकडं विहीर’ अशी काँग्रेसची स्थिती झाली आहे. (Congress News)
लवादाकडे याबाबत पुन्हा बुधवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत गोठवण्यात आलेल्या खात्यांवर व्यवहार करण्याची परवानगी मिळाल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे, पण त्यामुळे काँग्रेसची कोंडीच झाली आहे. याबाबत पक्षाचे खजिनदार अजय माकन (Ajay Maken) यांनी पक्षाची हतबलता सांगितली.
माकन यांनी एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, आमच्या याचिकेवर प्राप्तिकर विभाग (Income Tax) आणि प्राप्तिकर अपील लवादाकडे सुनावणी झाली. खात्यामध्ये किमान 115 कोटी रुपये शिल्लक ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यापुढील रक्कम खर्च करता येऊ शकते. याचा अर्ज 115 कोटी गोठवण्यात आले आहेत, पण ही रक्कम आमच्या खात्यांत असलेल्या रकमेपेक्षा खूप जास्त आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माकन यांनी केलेल्या या दाव्यामुळे लवादाच्या निर्णयाचा काँग्रेसला काहीच फायदा होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. तसेच सध्या भारत जोडो न्याय यात्राही सुरू आहे. त्यासाठी दररोज मोठा खर्च पक्षाला उचलावा लागत आहे. असे असताना बँक खाती गोठवण्यात आल्याने आर्थिक चणचण जाणवणार आहे. काँग्रेस व युवक काँग्रेसकडे 210 कोटी रुपयांची रिकव्हरी असल्याचे इन्कम टॅक्स विभागाकडून कळवण्यात आले आहे. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून मिळालेले पैसेही या खात्यामध्ये आहेत.
लाइट बिल भरायलाही पैसे नाहीत
आता कसलाही खर्च करण्यासाठी पक्षाकडे पैसे नाहीत. वीजबिल भरायला, कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे नसल्याचा दावा माकन यांनी आज सकाळी केला आहे. बँक खाती गोठवण्यात आल्याने सर्वच गोष्टींवर परिणाम होणार आहे. केवळ न्याय यात्राच नाही, तर सर्व राजकीय कार्यक्रमांवरच विपरीत परिणाम होईल, असे माकन यांनी सांगितले. आम्ही दिलेले चेक बँकेतून पुढे जात नसल्याची माहिती आम्हाला काल मिळाल्याचे माकन यांनी स्पष्ट केले होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.