Jyotiraditya Scindia News : ज्योतिरादित्य शिंदेंना मोठा दिलासा; खासदारकीबाबत हायकोर्टाचा निकाल

Rajya Sabha MP : निवडणुकीवेळी शिंदेंनी माहिती लपवल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्याने निवडीला आव्हान दिले होते.
Jyotiraditya Scindia
Jyotiraditya ScindiaSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या खासदारकीच्या निवडीविरोधात मध्य प्रदेश हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला शिंदे यांनी चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप घेत काँग्रेस नेत्यानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. (Jyotiraditya Scindia News)

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) हायकोर्टाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिला आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते डॉ. गोविंद सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. 2020 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत शिंदे यांनी भाजपच्या (BJP) तिकिटावर मध्य प्रदेशातून उमेदवारी अर्ज भरला होता.

Jyotiraditya Scindia
Lok Sabha Election 2024 : सस्पेन्स संपला! उत्तरेत ‘हे’ दोन नेतेच देणार काँग्रेसला ‘न्याय’...

गोविंद सिंह यांनी निवडणूक अर्जात भरण्यात आलेल्या माहितीबाबत आक्षेप घेतला होता. शिंदेंनी अर्जात चुकीची माहिती दिली आहे. शिंदे यांच्याविरोधात भोपाळमधील श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिलेली नाही, असे सिंह यांनी याचिकेत म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. कोर्टाने म्हटले की, केवळ एफआयआर दाखल होणे म्हणजे गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही, असे म्हणत याचिका फेटाळण्यात आली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज निकाल देण्यात आला.

दरम्यान, राज्यसभेवर जाण्याआधी शिंदे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारही बाहेर पडले. परिणामी, मध्य प्रदेशात सत्ताबदल झाला. कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते, तर शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री बनले होते. मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळाले आहे.  

R

Jyotiraditya Scindia
Arvind Kejriwal News : मोदींच्या डिग्रीवर बोलणं केजरीवालांना महागात पडणार; हायकोर्टानं दिला दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com