यशवंत जाधवांच्या घरी झाडाझडती सुरुच ; २ कोटी रुपये, १० बॅक लॅाकर्स जप्त

यशवंत जाधव यांच्यावर भाजपकडून भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
Yashwant Jadhav
Yashwant Jadhavsarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत वाढतच आहे. तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरूच आहे.

यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी (25 फेब्रुवारी) सकाळी साधारणत: सात वाजता आयकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हापासून चौकशी सुरू आहे. आयकर विभागाची ही चौकशी अद्यापही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

यशवंत जाधव यांच्यावर भाजपकडून भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरी छापा मारला.

आयकर विभागाने जाधव यांच्या घरातून दोन कोटी रुपये (Income Tax Seizes CASH) जप्त केले आहे. त्याचे दहा बॅक खात्यातील लॅाकर्स जप्त करण्यात आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी यांनी टि्वट करुन ही माहिती दिली. आज तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी जाधव यांची कसून चैाकशी करीत आहेत.

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे.

Yashwant Jadhav
शिवसेनेचे मंत्री राठोडांचा राजीनामा, मग राष्ट्रवादीच्या मलिकांचा का नाही?

प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून यामिनी जाधव यांनी 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. मात्र तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झाले आहे. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे.

आयकर विभाग एका हवाला एजंटचा तपास करत असताना त्याच्या मार्फत 15 कोटी रूपये काही रोख रक्कम आणि चेक स्वरूपात जाधव कुटूंबियांकडे आल्याचे दिसून आले. या उत्पन्नाची माहिती ही जाधव कुटूंबियांनी लपवली आणि त्यावर कर चुकवला नाही असा आयकर विभागाला संशय आहे.(Income Tax department raid at Yashwant Jadhav house continues from 36 hrs in Mumbai)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com