शिवसेनेचे मंत्री राठोडांचा राजीनामा, मग राष्ट्रवादीच्या मलिकांचा का नाही?

नवाब मलिकांच्या अटकेनंतर मंत्रिमंडळाने महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. या आंदोलनास कोणी परवानगी दिली ?
Nawab Malik, Uddhav Thackeray,Sanjay Rathod
Nawab Malik, Uddhav Thackeray,Sanjay Rathodsarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते मंत्रालय परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी शनिवारी उपस्थित केला. ते‌ पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचे जमीन खरेदी-विक्रीसंदर्भातील पुराव्यांच्या आधारे नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयानेही नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे एकप्रकारे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना पाठिशी घालण्याचाच प्रकार आहे."

Nawab Malik, Uddhav Thackeray,Sanjay Rathod
नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही!

"घटनात्मक दृष्ट्या एखाद्या सरकारी नोकरदाराला अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत त्याचे निलंबन करायचे असते. तसेच चार्टशीट दाखल झाल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करावे लागते. त्यानुसार मंत्र्याच्या अटकेनंतर ही प्रक्रिया का राबवली जात नाही," असे पाटील म्हणाले.

''मंत्रालयाच्या आवारात किंवा आसपासच्या परिसरात मराठा समाजबांधवांना,ओबीसी राजकीय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करु इच्छिणाऱ्यांना आंदोलनास परवानगी नाही. पण दुसरीकडे नवाब मलिकांच्या अटकेनंतर मंत्रिमंडळाने महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. त्यामुळे या आंदोलनास कोणी परवानगी दिली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी चंद्रकांतदादांनी केली.

Nawab Malik, Uddhav Thackeray,Sanjay Rathod
UNSC:युक्रेन-रशिया युद्धाचा भारताकडून निषेध ; मतदानावर बहिष्कार

पाटील म्हणाले "संजय राठोड यांचा राजीनामा शिवसेनेनं तातडीने घेतला. पण नवाब मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिवसेनेने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. महाविकास आघाडीसोबत सत्तेत असेपर्यंत शिवसेनेचे मतपरिवर्तन होऊच शकत नाही. कारण तिघांनी एकत्रित येऊन 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरवला आहे, त्यानुसार एकमेकांच्या निष्ठांना धक्का लागू नये, याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे टिपू सुलतानची जयंती साजरी केली; तर त्यांना चालतं. पण सावरकरांमुळे शिवसेना सोडून इतर दोन पक्षांच्या निष्ठा, मन दुखावणार असेल, तर सावरकर प्रेम जाहीर करायचं नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे सोयीनुसार शिवसेना सावरकर प्रेम व्यक्त करत असते,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com