Operation Sindoor : भारताची कारवाई अमेरिकेला झोंबली! ऑपरेशन सिंदूरला लज्जास्पद म्हणत ट्रम्प यांनी दोन्ही देशांना केलं मोठं आवाहन

Donald Trump On Operation Sindoor : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर मध्यरात्री दीडच्या सुमारास एअर स्ट्राईक केला. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल्यासाठी केलेल्या कारवाईवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे केलेली कारवाई 'इट इज शेम' अशी प्रतिक्रिया ट्रम्प त्यांनी दिली आहे.
Donald Trump
Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

India launches Operation Sindoor : पहलगाम येथे निष्पाप 26 भारतीयांची हत्या करणाऱ्या दहशवाद्यांचा बदला घेण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर मध्यरात्री दीडच्या सुमारास एअर स्ट्राईक केला. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल्यासाठी केलेल्या कारवाईवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

भारताने केलेली कारवाई 'इट इज शेम' अशी प्रतिक्रिया ट्रम्प त्यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही याबाबत ऐकलं आहे. इट इज शेम, अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल.

Donald Trump
Operation Sindoor : घुसके मारा! पाकिस्तान विरूद्धच्या ऑपरेशनला 'सिंदूर' नाव देण्यामागे आहे भावनिक कारण

हे दोन देश अनेक शतकांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. मला आशा आहे की हे सगळं लवकर संपेल. कोणीही हे पाहू इच्छित नाही की दोन शक्तिशाली देश युद्धाच्या दिशेने जात आहेत. हे दोन राष्ट्रे ऐतिहासिक वैर आणि तणाव घेऊन चाललेली आहेत.

मात्र, जगाला आता शांततेची गरज आहे, संघर्षाची नव्हे, अशी प्रकिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे भारताने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई ट्रम्प यांच्या पचनी पडलेली दिसत नाही. शिवाय ट्रम्प यांनी पाकिस्तानला देखील शक्तिशाली देश म्हटल्यामुळे आणि कारवाईला लज्जास्पद म्हटल्यामुळे त्यांना खरंच दहशतवादाविरोधात लढायचं आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Donald Trump
Operation Sindoor : त्यांचा सुपडासाफ करा...! 'ऑपरेशन सिंदूर'वर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, भारतीय लष्कराचं केलं तोंडभरून कौतुक

दरम्यान, भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतर लाहोर, सियालकोट विमानतळं पुढील 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहेत. तर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरमधील जामा मशीद सुभानअल्लाहवर देखील हल्ला केला. ही मशीद जैश-ए- मोहम्मदची हेडक्वार्टर असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com