New Delhi: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि विशेष म्हणजे भाजप त्यातही नरेंद्र मोदींना सत्तेपासून रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र आले आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडी स्थापन केली आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव हा एकमेव उद्देश या इंडिया आघाडीचा आहे. याचदरम्यान इंडिया आघाडीला 'बूस्टर' तर भाजपचं टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे.
विरोधकांच्या 'इंडिया'(India Alliance) आघाडीच्या घोषणेनंतर ५ सप्टेंबरला सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकासाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी लागला. यात इंडिया आघाडीने सातपैकी चार जागांवर विजय मिळवला चांगलं यश मिळवलं तर भाजपला तीन जागांवर विजय मिळाला. उत्तर प्रदेश, केरळ, झारखंड, उत्तराखंड,त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्यातील या पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या.
कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसचा (Congress) आत्मविश्वास दुणावलेला असतानाच विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सात राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करत चार जागांवर भाजपला पराभवाचा धक्का देत विजय खेचून आणला. त्यात उत्तर प्रदेशमधील प्रतिष्ठेच्या घोसी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना मोठा धक्का देत समाजवादी पक्षाने भाजपच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली.
या ठिकाणी समाजवादी पक्षाकडून निवडून आलेल्या दारासिंग चौहान यांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे दारासिंग आणि सपाच्या सुधाकर सिंह यांच्यात थेट लढत झाली. त्यात सिंह यांनी दारासिंग यांचा पराभव केला.
झारखंडमध्ये दुमरी मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाच्या बेबी देवी यांनी विजय संपादन केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. उत्तराखंडमध्ये बागेश्वर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप(BJP)च्या उमेदवार पार्वती दास यांनी विजय मिळवला. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्या निधनानंतर झालेल्या पुथुपल्ली मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे त्यांचा मुलगा चंडी ओमेन हे विजयी झाले.
पश्चिम बंगालमधील धुपगिरी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या निर्मल चंद्र रॉय विजय खेचून आणला. मात्र, त्रिपुरात दोन्ही जागांवर कमळ फुलले असून बॉक्सानगरमधून तफज्जल हसन व धनपूर मतदारसंघातून बिंदू देवनाथ यांनी विजय मिळवला. तर उत्तराखंडच्या बागेश्वर मतदारसंघातून भाजपच्या पार्वती दास निवडून आल्या आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.