Maratha Reservation Meeting : मोठी अपडेट! 'सह्याद्री'वर सरकार अन् जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळात महत्त्वाची बैठक

Chief Minister Eknath Shinde News : सरकारच्या 'जीआर' नंतर जरांगे पाटलांनी देखील एक पाऊल मागे घेत सरकारशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवलं आहे.
Eknath Shinde - Manoj Jarange
Eknath Shinde - Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आरपारच्या लढाईचा शुक्रवारी अकरावा दिवस आहे. राज्य सरकारच्या 'जीआर'मधील वंशावळी या शब्दावर जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाकडे वंशावळीचे कागदपत्रे नाहीत, असं जरांगे पाटील यांचे म्हणणं असून सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखला द्या अशी मागणी लावून धरत ते उपोषणावर ठाम आहे.

सरकारच्या जीआरनंतर जरांगे पाटलांनी देखील एक पाऊल मागे घेत सरकारशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवलं आहे. त्याच शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत सरसकट कुणबी दाखला देण्यासंदर्भात तोडगा निघणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

Eknath Shinde - Manoj Jarange
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाची धग 'ठाण्यात' ; थेट मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला बंद राहणार...

मुंबईतील 'सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) पाठवलेल्या शिष्टमंडळात १३ तज्ज्ञ आणि ८ गावकरी असल्याची माहिती समोर येत आहे.

सरसकट कुणबी दाखला या मुख्य मागणीवर सरकार आणि जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा केली जाणार आहे. सरकारकडून जीआर आणि महसुली, वंशावळ अशा नोंदी तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. मात्र, जीआरमधील वंशावळी या शब्दावर जरांगे पाटील यांनी आक्षेप नोंदवत वंशावळीचे कागदपत्र नाहीत. त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखला द्या अशी मागणी केली आहे.

Eknath Shinde - Manoj Jarange
Jalgaon Political News : जळगावात भाजप- शिंदे गटाकडून ठाकरे गटाची कोंडी ? छत्रपती शिवराय, सरदार पटेलांच्या पुतळा लोकार्पणास शासनाची स्थगिती

मराठा आरक्षणासाठी 'आर या पार'लढा पुकारत गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारलेले जरांगे पाटील आता मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. घरावर तुळशी पत्र ठेवून जिवाची पर्वा न करता जरांगेंनी सरकारला मराठा आरक्षणासाठी आक्रमक पावले उचलण्यास भाग पाडले. आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या अशाच आक्रमक, कणखर बाण्याच्या जरांगे पाटलांना आईला पाहताच हा सरकारसह यंत्रणांना घाम फोडणारा हा पहाडी माणूस काही क्षणांपुरता का होईना गहिवरला.

मराठा समाजाच्या न्यायासाठी दंड थोपटलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा शुक्रवारी अकरावा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घोषणेनंतर मराठा आरक्षणाबाबतचा महत्त्वपूर्ण जीआर देखील राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे.यानंतर जरांगे हे उपोषण मागे घेतील असे वाटले होते. पण तरीदेखील वंशावळीची अट नको म्हणत सुधारित जीआर काढा, नंतर उपोषण मागे घेणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली.

Eknath Shinde - Manoj Jarange
Amol Kolhe News : 'या' महिन्यातील संसदेचं अधिवेशन लोकसभेचं शेवटचं ठरणार,मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये होणार ? खासदार कोल्हेंचा मोठा दावा

मराठ्यांना आरक्षण द्या....

मराठा आरक्षणा(Maratha Reservation) साठी जीव देण्याची भूमिका घेत लढा उभारलेल्या लेकाला बघण्यासाठी अकराव्या दिवशी उपोषणस्थळी थेट मनोज जरांगे पाटलांची आई प्रभावती जरांगे पाटील दाखल झाल्या. यावेळी आई प्रभावती जरांगे पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाविषयी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, माझ्या मुलाच्या पाठी सर्वांनी उभं राहावं. मराठ्यांना आरक्षण द्या, माझ्या बाळाला न्याय द्या. सर्व बाळांना न्याय द्या असेही जरांगे पाटलांच्या आईने म्हटलंय.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com