I.N.D.I.A Alliance : ''काँग्रेसच्या व्यस्ततेमुळे 'इंडिया' आघाडीचे जागावाटप रखडले'' ; नितीश कुमारांकडून नाराजी व्यक्त!

Nitish Kumar News : ''सर्वांशी बोलून ही आघाडी झाली. मात्र, सध्या ....'' असंही नितीश कुमार यांनी बोलून दाखवलं आहे.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. भाजपविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची निर्मिती केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेतेमंडळी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने इंडिया आघाडीचे जागावाटप रखडले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitish Kumar
ED Raids on Rajkumar Anand : केजरीवालांचा आणखी एक मंत्री ED च्या रडारवर

तर, दुसरीकडे देशातील विरोधी पक्षांची एकजूट करण्यात व्यस्त असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र याबाबत गुरुवारी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. मागील काही दिवसांपासून इंडिया आघाडीची कोणतीही बैठक अथवा चर्चा झाली नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.

पाटणा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) 'भाजप हटाओ, देश बचाओ' रॅलीत त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. नितीश कुमार म्हणाले की, आम्ही देश वाचवण्यासाठी इंडिया आघाडी केली आहे. पाटण्यासह अनेक ठिकाणी आमच्या बैठका झाल्या.

देशाचा इतिहास बदलणाऱ्यांना हटवण्यासाठी सर्वांशी बोलून ही आघाडी झाली. मात्र, सध्या फारसे काम होत नाही. काँग्रेस पक्षाला पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत, पण त्यांना त्याची चिंता नाही. सध्या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांचे नेतेमंडळी व्यस्त आहेत.

Nitish Kumar
Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक होणार? आज होणार ED चौकशी

नितीश कुमार म्हणाले की, आगामी काळात पाच राज्यांच्या निवडणुका होऊ द्या, त्यानंतर विरोधी इंडिया आघाडीची बैठक होईल. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणार आहोत. आम्ही समाजवादी मंडळी आहोत. सीपीआयशी आमचे जुने नाते आहे, तर या वेळी भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की, आजकाल ते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भांडण लावत आहेत. मात्र, हिंदू आणि मुस्लिम समाजाला कोणतीही अडचण नाही. सर्वजण एकत्र आहेत, पण भाजपची मंडळी भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

Nitish Kumar
Maan Political News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आमदार गोरेंना शब्द; माण-खटावचा दुष्काळी यादीत समावेश होणार

दरम्यान, या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारावरही टीका केली. भाजपकडून देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यांना देशाच्या प्रती कसलाच आदर नाही, हे यातून दिसून येते. त्यामुळे जनतेनी याचा विचार करण्याची गरज आहे.

(Editorial - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com