India Alliance Rally : गजाआड असलेल्या केजरीवालांची गॅरंटी; महारॅलीत सहा मोठ्या घोषणा...

Arvind Kejriwal News : कथित मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवालांना ईडीने अटक केली आहे. आज त्यांच्या पत्नी सुनीता यांनी महारॅलीच्या व्यासपीठावरून त्यांचा संदेश वाचून दाखवला.
Arvind Kejriwal, Sunita Kejriwal
Arvind Kejriwal, Sunita KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (India Alliance Rally) यांच्या अटकेविरोधात आज दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडीची सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल पहिल्यांदाच इंडियाच्या व्यासपीठावर आल्या. यावेळी त्यांनी केजरीवालांचा संदेश वाचून दाखवला. यामध्ये त्यांनी सहा मोठ्या घोषणा केल्या. तसेच देशातील जनता केजरीवालांसोबत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

सभेमध्ये 'इंडिया'तील सर्वच पक्षांचे नेते हजर आहेत. या नेत्यांसमोर सुनीता केजरीवाल यांचे पहिल्यांदाच भाषण झाले. त्या म्हणाल्या, केजरीवालांना (Arvind Kejriwal) फार दिवस जेलमध्ये ठेऊ शकत नाहीत. अरविंद केजरीवाल तुम्हाला म्हणत आहेत की, मी तुमच्याकडे मते मागत नाही. निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कुणाला हरवण्यासाठी मदत मागत नाही. मी केवळ या देशाला पुढे नेण्यासाठी मदत मागत आहे.  

Arvind Kejriwal, Sunita Kejriwal
Himanta Biswa Sarma News : निवडणुकीआधीच दुसरं लग्न करा, नाहीतर जेलमध्ये! मुख्यमंत्र्यांचा खासदाराला इशारा

केजरीवालांकडून सहा घोषणा

सुनीता केजरीवाल यांनी भाषणादरम्यान अरविंद केजरीवाल यांची सहा आश्वासने वाचून दाखवली. देशात कोणत्याही भागात वीजकपात केली जाणार नाही, ही पहिली गॅरंटी केजरीवालांनी दिली आहे. तर देशातील सर्व गरिबांना मोफत वीज देण्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली. प्रत्येक गावात सुसज्ज शाळा असेल. सर्व समाजातील, स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळेल, ही केजरीलांची तिसरी गॅरंटी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकप्रमाणे देशातील प्रत्येक गावात असे क्लिनिक असेल. प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाईल, ही चौथी गॅरंटी केजरीवालांनी दिली. तर पाचवी गॅरंटी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन रिपोर्टनुसार शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळले. सहावी गॅरंटी दिल्लीकरांसाठी आहे. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाईल. या सर्व घोषणा सत्तेत आल्यानंतर पुढील पाच वर्षांत पूर्ण केल्या जातील, असे केजरीवालांनी यावेळी सांगितले.

मोदींना माझ्या पतीला जेलमध्ये टाकले. ते जनतेच्या भल्यासाठी लढत होते. कोट्यवधी लोकांच्या मनात केजरीवाल आहेत. तुमच्या केजरीवालांना हे जास्त दिवस जेलमध्ये ठेऊ शकत नाही. केजरीवाल वाघ आहेत, ते लढणार आहेत, अशी भावना सुनीता केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केली.

Arvind Kejriwal, Sunita Kejriwal
Loksabha Election 2024 : राजनाथसिंह यांच्या नेतृत्वात भाजपची 'निवडणूक जाहीरनामा समिती' जाहीर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com