Loksabha Election 2024 : राजनाथसिंह यांच्या नेतृत्वात भाजपची 'निवडणूक जाहीरनामा समिती' जाहीर!

Election manifesto committee of BJP : कॅबिनेट मंत्र्यांसह भाजपचे दिग्गज नेते मिळून 27 जणांचा आहे समावेश
Rajnath Singh
Rajnath SinghSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics News : देशभरात लोकसभा निवडणुकीच रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. उमेदवारांच्या नावांच्या याद्या घोषित होत आहेत. तर पक्षप्रेवशही जोरदार सुरू आहेत. सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधातील इंडिया आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनं देत आहे.

याच पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख आणि सत्ताधारी पक्ष भाजपने आपली निवडणूक जाहीरनामा समिती घोषित केली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 27 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संयोजक असून, केंद्रीयमंत्री पीयूष गोयल हे सहसंयोजक आहेत. उर्वरीत सदस्य आहेत. भाजपच्या सर्वच दिग्गज नेत्यांना या समितीमध्ये स्थान दिल्या गेल्याचं दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajnath Singh
Assembly Elections 2024 : निवडणुकीच्या आधीच भाजपचे आठ उमेदवार विजयी, 'या' राज्यात सत्ता मिळणार?

समितीमध्ये कोणाचा समावेश? -

राजनाथ सिंह- अध्यक्ष, निर्मला सीतारामन- संयोजक, पीयूष गोयल- सहसंयोजक, अर्जुन मुंडा- सदस्य, भूपेद्र यादव- सदस्य, अर्जुन राम मेघवाल- सदस्य, किरेन रिजीजू- सदस्य, अश्विनी वैष्णव- सदस्य, धर्मेंद्र प्रधान- सदस्य, भूपेंद्र पटेल- सदस्य , हिमंता बिस्वा सरमा- सदस्य, विष्णु देव सांय- सदस्य, मोहन यादव- सदस्य, शिवराज सिंह चौहान- सदस्य, वसुंधरा राजे- सदस्य, स्मृती इराणी - सदस्य, जुएल ओराम- सदस्य, रविशंकर प्रसाद- सदस्य, सुशील मोदी -सदस्य, केशव प्रसाद मौर्य- सदस्य , राजीव चंद्रशेखर- सदस्य, विनोद तावडे- सदस्य, राधामोहन प्रसाद अग्रवाल-सदस्य, मनजिंदर सिंह सिरसा- सदस्य, ओपी धनखड- सदस्य, अनिल अँटोनी- सदस्य आणि तारीक मंसूर- सदस्य

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 'अबकी बार चारसौ पार' असा नारा दिला आहे. आतापर्यंत भाजपाने देशभरातील आपल्या उमेदवारांच्या आठ याद्या जाहीर केल्या आहेत. तर उर्वरीत उमेदवारांच्या नावांच्या याद्या लवकरच जाहीर होणार आहेत. त्यात आता निवडणूक जाहीरनामा समिती गठीत झाल्याने लवकरच भाजपाच जाहीरनामाही प्रसिद्ध होऊ शकतो. भाजपाने एनडीए आघाडीसाठी 400 जागांचे तर भाजपसाठी 370 लोकसभा जागांचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Rajnath Singh
India Alliance Rally : शरद पवार, उद्धव ठाकरे दिल्लीत घेणार नरेंद्र मोदींचा समाचार; इंडिया आघाडीची उद्या महारॅली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com