India Alliance Rally : 'गुप्तचर यंत्रणेचा अंदाज चुकला?' रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा जनसागर; भाजपच्या राजकीय गणिताला धक्का!

India Alliance leaders Rahul Gandhi, Mamata Banerjee and Sanjay Raut lead massive rally Delhi Ramlila Maidan demanding CEC Gyanesh Kumar resignation : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा विराट मोर्चा; राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, संजय राऊत मैदानात; गर्दीच्या चर्चेने भाजपच्या गोटातही खळबळ?
India Alliance Rally
India Alliance RallySarkarnama
Published on: 
Updated on: 

Ramlila Maidan Crowd : निवडणूक आयोगातील नियमिततेविरोधात, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात इंडिया आघाडीने काल दिल्लीत जनमहाभियोग घेत केंद्रातील सत्ताधाऱ्यांना दिलेल्या सूचक इशाऱ्यानंतर आज दिल्लीतीर रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या मोर्चातून 'जनसागर' आला आहे.

या मोर्चात होणाऱ्या गर्दीबाबत केंद्रातील भाजप सत्ताधाऱ्यांचा अंदाजच चुकला असतानाच, गुप्तचर यंत्रणेने दिलेला गर्दीचा आकडा देखील फेल ठरला.

'इंडिया' आघाडीने या रॅलीला देशभरातून 10 लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा केला होता. दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर अहवालानुसार सुमारे 70 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली होती. पण प्रत्यक्षात दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनसागर आला आहे. रामलीला मैदानाकडे येणारे सर्वच्या सर्व रस्ते गर्दी व्यापून गेले होते. त्यामुळे केंद्रातील भाजप (BJP) सत्ताधाऱ्यांचा मोर्चातील गर्दीबाबतचा अंदाजच चुकालच, असे भाजपचेच नेते आता खासगी बोलत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी वाड्रा, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अभिषेक बॅनर्जी, के. सी. वेणुगोपाल, सचिन पायलट यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

India Alliance Rally
Mahayuti Government : 'महायुती कोसळेल!' काँग्रेस नेत्याचे मोठे भाकीत; विधान परिषदेच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांत भूकंप

इंडिया आघाडीच्या भव्य मोर्चात सहभागी झालेले काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, "न्याय मिळावा, लोकशाहीचे रक्षण व्हावे आणि मतांची चोरी थांबवावी, या मागण्यांसाठी लोक दिल्लीत आले आहेत. संपूर्ण देशातील वातावरण बदलत आहे. हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कारवाया बेकायदेशीर आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा."

India Alliance Rally
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना सत्तेत ठेवायचं, पण ताकद वाढू द्यायची नाही? भाजपची रणनीती उघड, महायुतीत राजकीय भूकंपाची चिन्हे!

जनताच सर्वोच्च : सचिन पायलट

"लोकशाहीमध्ये जनताच सर्वोच्च असते. आपण जिंकू किंवा हरू, यापेक्षा जनतेला नेहमीच केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. काँग्रेस हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. आम्ही अहिंसा, प्रेम, आपुलकी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्यावर विश्वास ठेवतो. लोकशाही टिकून राहावी, अशी आमची इच्छा आहे. तसेच, निवडणूक आयोगाने निष्पक्षता राखत प्रजासत्ताकाची मूलभूत मूल्ये अबाधित ठेवलीच पाहिजे, असेही सचिन पायलट म्हणाले.

संजय राऊत मोर्चात सहभागी.....

इंडिया आघाडीच्या भव्य सभेत सहभागी होताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष देखील सहभागी झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी, क्रांती येत आहे अन् होणार आहे. आम्ही सत्तापरिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असा विश्वास व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.