Congress, RJD and Union Budget : अर्थसंकल्पात बिहारसाठीच्या घोषणांवरून I.N.D.I.A ब्लॉकमध्ये फूट? ; 'काँग्रेस' अन् 'राजद'...

Union Budget and India Alliance : बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे आणि असं जाणवतय की केंद्रीय अर्थसंकल्पामुळे इंडिया आघाडी बिहारमध्ये बॅकफूटवर आली आहे.
Rahul Gandhi, Lalu Prasad Yadav
Rahul Gandhi, Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar in Union Budget : केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारसाठी झालेल्या घोषणांवरून, इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राजदमधील समतोल बिघडल्याचे दिसत आहे. काँग्रेस म्हणत आहे की सगळं बिहारलाच दिलं आहे. तेच राजदचा दावा आहे की राज्यासाठी कोणतीच नवीन घोषणा केली गेली नाही.

बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक(Vidhansabha Election) होणार आहे आणि असं जाणवतय की केंद्रीय अर्थसंकल्पामुळे इंडिया आघाडी बिहारमध्ये बॅकफूटवर आली आहे. त्यामुळेच नेमकं कशापद्धतीने यावर प्रतिक्रिया द्यावी, याबाबत इंडिया आघाडीतील पक्षांमध्येच मत मतांतरे दिसत आहेत. तर दुसरीकडे अर्थसंकल्पातून बिहारसाठी करण्यात आलेल्या तरतूदींमुळे एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

Rahul Gandhi, Lalu Prasad Yadav
PM Modi on Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदींची खास प्रतिक्रिया; निर्मला सीतारामन यांचेही केले कौतुक, म्हणाले...

केंद्र सरकारने बिहारसाठी विशेष मखाना बोर्डची स्थापना केली आहे. ही बिहारच्या मिथिलांचल भागासाठी अतिशय मोठी घोषणा आहे, कारण येथून मखाना पुरवठा जगभर केला जातो. परंतु आजपर्यंत यासाठी कोणतीही व्यवस्थित व्यवस्था नव्हती.

अर्थसंकल्पात बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना खूश ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न मोदी सरकारनं केल्याचं दिसून येत आहे. केंद्रातील मोदी सरकारने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खूश करण्यासोबतच बिहारमधील मतांवर डोळा ठेवल्याची चर्चा आहे. याचमुळे ग्रीनफिल्ड विमानतळ, मखाना बोर्ड आणि पटना आयआयटीचा विस्तार या प्रमुख घोषणांचा समावेश आहे.मिथिलांचलमधील ‘वेस्टर्न कॉस्ट कॅनॉल’ प्रकल्पाचाही घोषणा केली आहे.

Rahul Gandhi, Lalu Prasad Yadav
Chhagan Bhujbal on Union Budget 2025: ''हा अर्थसंकल्प...'' ; छगन भुजबळांची केंद्रीय अर्थसंकल्पावर विशेष प्रतिक्रिया!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारमध्ये शेतकरी वर्गासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान,उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ही संस्था संपूर्ण पूर्व भागातील अन्न प्रक्रिया उपक्रमांना बळकट करणार आहे

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com