Mumbai Political News : अंबरनाथच्या शूटिंग रेंजमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रशिक्षित नेमबाजांनीही आश्चर्यचकित करत अचूक निशाणा साधला. या कामगिरीनंतर नेमबाज आणि त्यांच्या प्रशिक्षकांनीही टाळ्या वाजवून शिंदेंनी साधलेल्या 'अचूक निशाण्याचे' कौतुक केले. त्यांच्या या कौशल्याने राजकारणात ते काेणा-काेणाचा गेम करणार, अशी चर्चा सुरू झाली. (Latest Political News)
अंबरनाथ शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याच पुढाकाराने पालिकेने रायफल आणि पिस्तूल शूटिंग रेंज उभारली आहे. या शूटिंग रेंजमध्ये पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षकांकडून मोफत प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांनी नुकतेच जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवत पदकांची कमाई केली.
यानंतर खासदार शिंदे हे या मुलांचं कौतुक करण्यासाठी शूटिंग रेंजमध्ये पोहोचले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना रायफल शूटिंगचा मोह आवरता आला नाही. हातात रायफल घेऊन त्यांनी निशाणा साधला आणि तोही अगदी अचूक! शिंदेंनी 'पॉइंट ब्लॅंक'मध्ये लावलेला अचूक निशाणा पाहून तिथे उपस्थित प्रशिक्षित नेमबाजच नव्हे, तर त्यांच्या प्रशिक्षकांनीही टाळ्या वाजवून खासदार शिंदेंचे कौतुक केले. (Maharashtra Political News)
एकीकडे वडील एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट मिळाल्यानंतर त्यांनी आपण यापूर्वीच एक मोठं ऑपरेशन केल्याचं सांगितलं होतं, तर दुसरीकडे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे नेमबाजीचं कोणतंही प्रशिक्षण न घेता अचूक निशाणा साधल्यानं आता भविष्यात ते काेणा-काेणावर नेम लावणार, अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.