EVM Machines: आणखी एका देशात EVM वर निवडणूक होणार : भारतासोबत केला ऐतिहासिक करार, निवडणूक आयोगाकडे मागितली मदत

India EVM, Indonesia Elections, Election Commission: इंडोनेशिया भारताच्या ईव्हीएम तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या तयारीत असून, निवडणूक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि कौशल्य देवाणघेवाणीसाठी दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार होणार आहे.
India and Indonesia move towards an agreement on EVM technology and election management cooperation to strengthen transparent and efficient democratic processes.
India and Indonesia move towards an agreement on EVM technology and election management cooperation to strengthen transparent and efficient democratic processes.Sarkarnama
Published on
Updated on

India EVM: देशांतर्गत पातळीवर ईव्हीएम तंत्रज्ञानावरून सातत्याने राजकीय वाद रंगत असतानाच, जगातील तीसरी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या इंडोनेशियाने मात्र भारताच्या याच निवडणूक प्रणालीवर विश्वास दर्शवला आहे. इंडोनेशिया आपल्या देशातील निवडणूक व्यवस्था आधुनिक करण्यासाठी भारताची ईव्हीएम यंत्रे, निवडणूक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याची मदत घेणार असून, यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये लवकरच एक ऐतिहासिक सामंजस्य करार होणार आहे. इंडोनेशियाने भारताची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे घेण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्या दृष्टीने करार होऊ घातला आहे.

जागतिक पातळीवर निवडणूक व्यवस्थापनामध्ये भारत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून नावारूपास येत असून तो इतर देशांना तंत्रज्ञान, संस्थात्मक अनुभव आणि सर्वोत्तम कार्यप्रणाली उपलब्ध करून देत आहे. आता याच आघाडीवर इंडोनेशिया देखील भारताची मदत घेणार आहे. भारतामध्ये वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) इंडोनेशियाने देखील वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरामध्ये भारत पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे. भारताचा निवडणुका घेण्याचा अनुभव देखील दांडगा आहे. ईव्हीएमपासून कौशल्यापर्यंत, भारत केवळ तंत्रज्ञानाची निर्यात करत नाही तर जगभरातील लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी तो अन्य देशांना मदत करतो, ही बाब लक्षात घेवून अन्य देशही भारताकडेच मदत मागत आहेत.

India and Indonesia move towards an agreement on EVM technology and election management cooperation to strengthen transparent and efficient democratic processes.
Maharashtra News Live Update : 'ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण...' : आमदार निलेश राणे

२८ देशांना लाभ अन् तीन करार

भूतान, नेपाळ आणि नामिबियापासून ते इंडोनेशियापर्यंत भारताचे निवडणूक मॉडेल जागतिक स्तरावर एक आदर्श प्रारूप म्हणून ओळखले जाते. भारतीय निवडणूक आयोगाने ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह २८ देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि तीन आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य करार केले आहेत.

ऋणानुबंध भक्कम

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील करारामुळे निवडणूक तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास, क्षमता बांधणी आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींच्या देवाण-घेवाणीला चालना मिळेल. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच ईव्हीएम रचना, निवडणूक पर्यवेक्षण प्रणाली, मतदार जागृती उपक्रम आणि डिजिटल साधनांचा अभ्यास केला असून त्यासाठी दौरेही केले आहेत.

India and Indonesia move towards an agreement on EVM technology and election management cooperation to strengthen transparent and efficient democratic processes.
Supreme Court on SIR : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; विरोधकांना दणका देत निवडणूक आयोगाची थोपटली पाठ...

कोणी काय घेतले:

भूतान: ईव्हीएम प्रणाली

नेपाळ: ईव्हीएम अन् संस्थात्मक सहकार्य

नामिबिया: ईव्हीएम अन् व्हीव्हीपॅट

मादागास्कार: शाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com