India Vs Pakistan : पाकिस्तानी नागरिकांना मोदी सरकारकडून मोठा दिलासा; गृह मंत्रालयाचा नवा आदेश

Future Implications on Indo-Pak Visa Policies : पाकिस्तानी नागरिकांना 30 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे.
India-pakistan Border
India-pakistan BorderSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी जाण्याचे आदेश काढले होते. त्यांचा व्हिसा रद्द करून तातडीने देश सोडण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून मायदेशी जाण्यासाठी गर्दी करत होते. पण आता मोदी सरकारने याबाबत महत्वाच निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी नागरिकांना 30 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतचा आदेश काढला आहे. पाकिस्तानी नागरिक आता पुढील आदेशापर्यंत मायदेशी परत जाऊ शकतात, असे आदेश स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळाला असून ते पुढील आदेश येईपर्यंत अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात जाऊ शकतात.

India-pakistan Border
Alok Joshi : कोण आहेत आलोक जोशी? ज्यांचं नाव ऐकताच पाकिस्तानला फुटतो घाम!

दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कडक पावले उचलताना पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केल्यानंतर मागील सहा दिवसांत 786 जणांनी अटारी-वाघा बॉर्डवरून देश सोडला आहे. त्यामध्ये पाकिस्तान व्हिसावर भारतात आलेले आठ भारतीय नागरिकही होते. तसेच 55 राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबाचाही यात समावेश आहे.

सार्क व्हिसा असणाऱ्यांसाठी भारत सोडण्याची मुदत 26 एप्रिल तर वैद्यकीय व्हिसा असलेल्यांसाठी 29 एप्रिल ही मुदत होती. तर दीर्घकालीन व्हिसा आणि हिंदू पाकिस्तानी नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी 25 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

India-pakistan Border
Rahul Gandhi supports caste census: काँग्रेसचा मोदींच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा; पण राहुल गांधी म्हणाले...

दरम्यान, व्हिसा रद्द केल्यानंतर भारतात आलेल्या अनेक पाकिस्तानी महिलांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. काहींच्या कुटुंबांची ताटातुट झाल्याने त्यांच्याकडून सरकारला आवाहन करण्यात आले होते. आता केंद्राने देश सोडण्याची मुदत वाढविल्याने या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे काही नागरिकांनी भारतीय नागरिकत्वासाठीही अर्ज केला आहे. त्यांचा अर्ज प्रलंबित आहे. त्यांच्या अर्जावरही या कालावधीत निर्णय होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com